Maharashtra Budget Session : राऊतांना 'ते' विधान भोवणार? सत्ताधारी आक्रमक, हक्कभंग कारवाईची टांगती तलवार

Sanjay Raut : यशवंतराव चव्हाण,शरद पवारांपासूनची उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राच्या विधीमंडळाला आहे. तरीही तुम्ही...
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama

Maharashtra Assembly Session 2023 : शिंदे-भाजपा सरकारने तपास यंत्रणांच्या माध्यमातून किरीट सोमय्यांसारख्या २८ चोरांना क्लिनचीट देण्याचा उपक्रम राबवला आहे. हे विधीमंडळ नाही, चोरमंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढलं तरी आम्ही पक्ष थोडीच सोडणार आहे. आम्ही पक्षातच राहणार आहोत अशी पदे आम्ही ओवाळून टाकतो अशी घणाघाती टीका संजय राऊत यांनी केली होती. आता त्यावरुन सत्ताधारी आक्रमक झाले असून विधानसभेच्या अधिवेशनातही त्याचे तीव्र पडसाद उमटले. आता राऊतांवर हक्कभंग कारवाईची टांगती तलवार आहे.

विधानसभेत संजय राऊतां(Sanjay Raut) च्या विधानाचे विधानसभेत जोरदार घमासान झाले. भाजप व शिवसेनेनं राऊतांच्या टीकेवरुन आक्रमक पावित्रा घेत सभागृहात लक्ष वेधलं. यावेळी त्यांनी या सभागृहात बसलेल्यांना राऊत चोर म्हणताय. तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली.

तसेच शिवसेना(Shiv sena) प्रतोद भरत गोगावले म्हणाले, संजय राऊत हे भरकटले आहेत. राऊत वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळे डिक्शनरीतून रोज नवा शब्द शोधून काढून बोलत आहेत. त्यांच्या तोंडाला करवंदीचा काटा लावला पाहिजे. आता आम्ही त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करतोय अशी माहिती गोगावले यांनी दिली.

Sanjay Raut
Supreme Court hearing : ...म्हणून आम्ही राज्याबाहेर गेलो; शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले कारण

...तरीही तुम्ही चोरमंडळ म्हणता?

भाजपचे आमदार अतुल भातखळकर(Atul Bhatkhalkar) यांनी राऊत यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. भातखळकर म्हणाले, राऊत यांनी विधिमंडळ नव्हे चोरमंडळ आहे असं सरळ सरळ म्हटलं आहे.

मात्र, या महाराष्ट्राच्या विधिमंडळाला उज्ज्वल परंपरा आहे. यशवंतराव चव्हाणांपासून ते शरद पवारांपासूनची ही उज्जवल परंपरा आहे. तरीही तुम्ही चोरमंडळ म्हणता. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे राऊतांनी जो विधिमंडळाचा अपमान केला त्याबाबत मी हक्कभंगाची सूचना दिली आहे असंही भातखळकर म्हणाले.

Sanjay Raut
Maharashtra Budget Session : "विधीमंडळ नाही, चोरमंडळ.." ; राऊतांची घणाघाती टीका

संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?

सरकार बदलताच तपास यंत्रणांच्या माध्यमातून शिंदे फडणवीस सरकारने २८ चोरांना क्लिनचिट देण्याचा उपक्रम राबवला आहे. राज्यात सध्या विधिमंडळ नसून ४० जणांचं चोरमंडळ आहे अशी खोचक टीकाही त्यांनी केली. तसेच २०२४ मध्ये सगळ्याचा हिशोब होईल. जे लोकं सरकार विरोधात बोलतात, त्यांना तुरुंगात टाकायचं. त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करायचे. त्यांची बदनामी करायची, एवढेच उद्योग सध्या सुरू आहे. पण आताच्या सत्ताधाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, की २०२४ मध्ये सगळ्यांचा हिशोब केला जाईल असेही राऊत यावेळी म्हणाले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com