Delhi Mayor Election : महापौर निवडणुकीपूर्वी राडा ; आप-भाजपचे नगरसेवक भिडले,खुर्च्या फेकल्या..

MCD Election : मतदान सुरू होण्यापूर्वी नागरी केंद्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.
Delhi Mayor Election
Delhi Mayor Election sarkarnama

Delhi Mayor Election: दिल्ली महापालिकेत आज राडा पाहायला मिळाला. उपमहापौर, स्थायी समितीच्या सदस्यांची नियुक्ती होण्यासाठी सभागृहात नगरसेवक जमले होते. यावेळी भाजप आणि आपचे नगरसेवक एकमेकांशी भिडले. (Delhi Mayor Election news update)

मतदानापूर्वी नगरसेवकांना शपथ घ्यावी लागते. मात्र त्यापूर्वीच सभागृहात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाल्याने पोलिसांना यात हस्तक्षेप करावा लागला. दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या विरोधात जोरदारपणे घोषणाबाजी करण्यात आली. नामनिर्देशित नगरसेवकांच्या शपथविधीबाबत दिल्ली महापौर निवडणुकीसाठी मतदान सुरू होण्यापूर्वी नागरी केंद्रात मोठा गोंधळ पाहायला मिळाला.

Delhi Mayor Election
Deven Bharti : मुंबई पोलिसांमध्ये मतभेद आहेत का ?; देवेन भारतींचे टि्वट व्हायरल

महापालिकेच्या निवडणुकीनंतर महिन्याभरानंतर महापौर निवडणुकीपूर्वी हा गोंधळ झाला आहे. नागरी केंद्रात झालेल्या या हाणामारीबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी टि्वट करीत भाजपवर निशाणा साधला आहे. मतदान टाळणे, निवडणुक अधिकाऱ्यांची बेकायदा निवड करणे, स्वीकृत सदस्यांची बेकायदा निवड असे प्रकार भाजपकडून केले जात असल्याचा आरोप मनीष सिसोदिया यांनी केला आहे.

Delhi Mayor Election
Lokayukta Bill : शिंदे-फडणवीसांना अपयश : 'लोकायुक्त' रखडल्याचे 'हे' आहे कारण..

जनतेने निवडून दिलेल्या नगरसेवकांना शपथ देताना गोंधळ करणे, म्हणजे जनतेच्या निर्णयाचा अवमान करण्यासारखे आहे, मग ही निवडणूक कशासाठी घेतली, असा सवाल सिसोदिया यांनी उपस्थित केला आहे.

आम आदमी पक्षाचे नगरसेवक प्रवीण कुमार म्हणाले, "भाजपचे नेते महापालिकेत गुंडागिरी करीत आहेत, निवडून आलेल्या नगरसेवकाच्या अगोदर स्वीकृत सदस्यांना शपथ दिली जात आहे. आम्ही जेव्हा याला विरोध केला तेव्हा त्यांनी गोंधळ केला आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com