बचत गटाच्या महिलांची कोट्यावधींची फसवणूक; एसआयटी मार्फत चौकशीची कुटेंची मागणी

राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन कंपनीमार्फत महिलांची फसवणूक झाल्याचा आरोप
बचत गटाच्या महिलांची कोट्यावधींची फसवणूक; एसआयटी मार्फत चौकशीची कुटेंची मागणी
Sanjay Kutesarkarnama

मुंबई : महिला बचत गटाच्या (Womens self-help group) माध्यमातून अनेक महिला चांगले काम करीत आहे. मात्र, बचत गटाच्या महिलांची एका खासगी संस्थेच्या माध्यमातून फसवणूक झाली आहे. महिला गृहउद्योगाच्या नावाखाली राज्यभरातील हजारो महिलांची कोट्यवधींची फसवणूक झाली, असल्याचा गंभीर आरोप भाजपचे (Bjp) आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांनी केला आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करावी, व या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार अजित हिवरे याला तातडीने अटक करावी, अशी मागणी कुटे यांनी केली आहे.

संजय कुटे यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत घेतली. या घोटाळ्यांची चौकशी करावी असे निवेदन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आले असून फसवणूक झालेल्या महिलांना न्याय मिळाल्याखेरीज भाजप स्वस्थ बसणार नाही, असा इशारा कुटे यांनी दिला. कुटे यावेळी म्हणाले की, अजित हिवरे हा सातारा जिल्ह्यातील आहे. त्यांने राधाकृष्ण सेल्स कॉर्पोरेशन या कंपनीमार्फत महिलांना स्वयंरोजगार देण्याचा व्यवसाय सुरु केला.

Sanjay Kute
राज ठाकरेंच्या उत्तर सभेनंतर आता देवेंद्र फडणवीस घेणार बूस्टर डोस सभा

मसाले पॅकिंग मशीन, बटन तयार करण्याचे मशीन, आटा मशीन याची विक्री राज्यभरात करण्यात आली. सुमारे २६ जिल्ह्यांत या कंपनीच्या शाखा उघडल्या. प्रत्येक जिल्ह्याजिल्ह्यात ऑफिसर नेमून व्यवसाय सुरु केला. प्रत्येक मशीनची किंमत ११ ते १५ हजार रुपया दरम्यान महिलांना विकली. प्रत्यक्षात पॅकिंगच्या मशीनची किंमत 1100 ते 1500 रुपये आहे. ती मशीन 11 हजारात विकली गेली. दुसरी एक मशीन ६०० ते ७०० रुपयाची आहे ती 11 हजार रुपयात विकली गेल्याचे कुटे यांनी सांगितले.

या मशीनद्वारे निर्माण केलेला माल कंपनीकडून खरेदी करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. सुरुवातीला २-३ महिने महिलांनी खरेदी केलेल्या मशीनच्या मार्फत तयार झालेल्या वस्तू कंपनीने खरेदीही केल्या. त्यानंतर मात्र, कंपनीकडून वस्तू खरेदी बंद झाली. आता तर कंपनीचे पुण्यातील कार्यालय बंद करण्यात आले आहे. तसचे कंपनीचा मालक हिवरे हा फरार झाला आहे. व्यवसाय वाढीसाठी अकोला, बुलडाणा जिल्ह्यात सत्ताधारी राष्ट्रवादी नेत्यांच्या नावाचा वापर केला गेला, असल्याचा आरोपही कुटे यांनी केला.

Sanjay Kute
संग्राम थोपटेंचा राष्ट्रवादीला मोठा धक्का : बुजूर्ग नेते शिवाजीराव कोंडे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

हजारो महिलांनी ११ हजार रुपये भरून मशीन खरेदी केल्या आहेत. आपली फसवणूक झाल्यावर अनेक ठिकाणी महिलांनी पोलिसांकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. फसवणूक झालेल्या महिलांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहनही कुटे यांनी केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.