Diva Accident| दिवा'त खड्ड्यांना आणखी एक बळी; तरुणाचा मृत्यू

Accident news| दिव्यातील रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काम न झालेल्या अनेक रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे.
Diva Accident news
Diva Accident news Sarkarnama

डोंबिवली : दिवा-आगासन रोडवर साईबाबा नगर येथील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांनी एका निष्पाप तरुणाचा बळी घेतला आहे. गणेश पाले असे मृत तरुणाचे नाव असून हा अपघात सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. पावसाळा सरत आला तरी दिव्यातील रस्त्यांचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. काम न झालेल्या अनेक रस्त्यांची खड्ड्यांनी चाळण झाली आहे. (Diva Accident News)

या घटनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत कामांच्या घोषणा फक्त कागदावर होत आहेत. पण प्रत्यक्षात कामं होत नाहीत. हे खड्डे अजून किती बळी घेणार? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच दिवा भाजपचे मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनीही ट्विट करत दिवा आगासन रोडवर अजून ठाणे महापालिका किती लोकांचे जीव जाण्याची वाट पाहत आहे ? असा सवाल महापालिका प्रशासनाला केला आहे.

Diva Accident news
Nitin Gadkari : विहिरीत उडी घेईल, पण..; वापरा अन् फेका ही पॉलिसी चांगली नाही, गडकरी संतापले

गेल्या दोन वर्षानंतर गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. गणेश उत्सव जवळ आल्याने सर्वजण खरेदीसाठी लगबग करू लागले आहेत.त्यातच दिवा शहरात रात्री 8 वाजत्या सुमारास एक दुर्दैवी घटना घडली. दिवा-आगासन रस्त्यावरून गणेश रात्री 8 वाजता दुचाकीवरुन जात होता. पण रस्त्यावर खड्डे असल्याने तो आपली दुचाकी हळुवार चालवत, खड्डे चुकवत जात होता. मात्र एक मोठा खड्डा चुकवत असताना त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला. तेवढ्यात समोरुन येणाऱ्या ट्रकच्या खाली सापडल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान यापूर्वीही याच रस्त्यावर अपघात झाले आहे. मात्र ठाणे महापालिकेचे अधिकारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नाहीत. एककीकडे महापालिकेचे अधिकारी स्मार्ट सिटीचे पुरस्कार घेऊन आपली प्रशंसा करत आहेत, रस्त्याच्या कामाकडे मात्र दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

आता या अपघाताचे सीसीटीव्ही समोर आले असून मनसे आणि भाजपने ठाणे महापालिका ट्विट करत अजून किती बळी घेणार असा सवाल केला आहे.मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करून सांगितले की दिवा ठाण्यात आणि ठाण्याचेच मुख्यमंत्री..दिव्यात आज पुन्हा एकदा खड्यामुळे बळी गेला. कामांच्या फक्त कागदावर घोषणा होत आहेत पण कामं होत नाहीत. पालिका अजून किती बळी घेणार? तर दुसरीकडे भाजपचे दिवा मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे यांनी सांगितले की सदर रस्त्याचे काम चालू आहे,त्यामुळे या रस्त्याचे काम करणारा ठेकेदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा.....

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in