Nitish Kumar News: विरोधकांची मोट बांधण्यासाठी नितीश कुमारांचं एक पाऊल पुढे; ठाकरे, पवारांची उद्या घेणार भेट

Nitish Kumar- Uddhav Thackeray meet : नितीश कुमार, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार?
Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad Pawar
Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad PawarSarkarnama

Mumbai : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपविरोधात विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. यामध्ये नितीश कुमार यांनी पुढाकार घेत विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असल्याचे बोलले जात आहे.

आता बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या मुंबईत भेट घेणार आहेत.

Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad Pawar
Karnataka Exit Poll : 'या' दोन एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत !

त्यामुळे या भेटी दरम्यान, नितीश कुमार, तेजस्वी यादव, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नितीश कुमार हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर ते शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत.

Nitish Kumar, Uddhav Thackeray and Sharad Pawar
Karnataka Election Exit Poll: कर्नाटकात कोण ठरणार किंग; काय सांगतात एक्झिट पोलचे आकडे?

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपविरोधात मजबूत आघाडी बनवण्यासाठी विरोधकांच्या हालचाली सुरू आहेत. याबरोबरच देशात तिसऱ्या आघाडीचीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे नितीश कुमार यांचा हा महाराष्ट्र दौरा विरोधकांच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com