Nashik Graduate Constituency: नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट: शुभांगी पाटील नॉट रिचेबल

भाजपकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवार शुभांगी पाटील यांना आता महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे.
Shubhangi Patil
Shubhangi Patil Sarkarnama

नाशिक पदवीधर मतदार संघाच्या ठाकरे गटाने पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आल्याचे दिसत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारीवरून राजकीय नाट्य संपताना दिसत नाही, काँग्रसकडून डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिलेली असताना त्यांनी अर्ज भरला नाही. डॉ. तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी अखेर अपक्ष अर्ज भरला. मात्र यानंतर आता या नाट्यात आणखी एक ट्विस्ट आले. भाजपकडून इच्छुक असणाऱ्या उमेदवार शुभांगी पाटील यांना आता महाविकास आघाडीने पाठिंबा दिला आहे. यामुळे आता तांबेंना ही निवडणूक सोपी राहिली नसल्याचे बोलेले जात आहे

Shubhangi Patil
Nashik District Bank : मंत्री दादा भुसेंच्या घरावर शेतकऱ्यांचा बिऱ्हाड मोर्चा; नेमकं कारण काय?

भाजपकडून इच्छुक असणाऱ्या आता महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील कोण आहेत ? शुभांगी पाटील यांनी बीए, डीएड, एम.ए. बीएड आणि एल एल बी मध्ये शिक्षण पूर्ण केले आहे. त्या आता धुळ्यातील भास्कराचार्य संशोधन संस्थेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. यासोबतच त्या महाराष्ट्र टीचर्स असोसिएशन आणि महाराष्ट्र स्टुडंट्स असोसिएशनच्या संस्थापक आहेत. तसेच पाटील या महाराष्ट्र नर्सिंग अँड पॅरामेडिकल एम्पॉईज असोसिएशनच्या प्रमुख सल्लागार आहेत.नंदुरबार जिल्ह्यातील मोलगी ग्रामविकास मंडळाच्या त्या सचिव आहेत. शुभांगी पाटील या धुळ्यातील एज्युकेशन सोसायटी आणि जळगावच्या गोपाल बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा आहेत.

शुंभागी पाटील यांनी नुकतंच भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. भाजपचं समर्थन आपल्याला मिळावे यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. मात्र भाजपचा पाठिंबा सत्यजीत तांबे यांना मिळणार, असे चित्र दिसताच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाशी संपर्क केला. यामध्ये ठाकरे गटाने आता त्यांना उमेदवारीही दिली.

आता महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधरची जागा शिवसेना ठाकरे गटाला देण्यात आली आहे. शुभांगी पाटील या महाविकास आघाडी व शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार आहेत. यामुळे आता या निवडणुकीची रंगत वाढली आहे. काँग्रेसने आता सत्यजीत तांबे यांना पाठिंबा नाकारल्यामुळे तांबे यांचा मार्ग काही अंशी कठीण होणार आहे, असे चित्र दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in