उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; खासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

काल खासदार संजय राऊतांची कारागृहातून सुटका आणि आज कीर्तिकरांनी ठाकरेंची साथ सोडली.
MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group Latest News
MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group Latest NewsSarkarnama

पुणे : शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर अखेर शिंदे गटात जाणार असल्याचे निश्चित झाले आहे. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्यमंदिर येथे प्रवेश करणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून खासदार गजानन कीर्तिकर हे शिंदे गटात जातील अशा चर्चा होत्या. मात्र ते आत्तापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच होते. (MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group Latest News)

MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group Latest News
अफजल खान कबर अतिक्रमण पाडकामाचा अहवाल सुप्रीम कोर्टाने मागवला..सुनावणी सुरू

शिंदे गट आणि ठाकरे गटांमध्ये आपण समेट घडायला हवी,अशी इच्छा देखील त्यांनी अनेकदा व्यक्त केली होती आणि त्यासाठी मी पुढाकार घेईल, असेही ते बोलले होते. मात्र अखेर त्यांनी आपला मार्ग निवडला असून शिंदे गटात जाण्याचा ठरवलं आहे.

शिंदे यांच्या गटात या आधीच शिवसेनेचे बारा खासदार गेले आहेत.आता कीर्तीकरांच्या जाण्यामुळे शिंदे गटाकडे खासदारांची संख्या तेरा झाली आहे. तर ठाकरे गटाकडे फक्त सहाच खासदार उरले आहेत.

MP Gajanan Kirtikar| Eknath Shinde Group Latest News
कॉंग्रेसला विरोध ही आमची चूकचं..इंदिरा गांधींना 'त्या' चुकीची शिक्षा मिळाली होती : दक्षिणायन

दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गटात मी समिट घडवणार,असं कीर्तिकरांनी वारंवार सांगूनही फारसं काही होत नसल्याने त्यांनी आपला मार्ग निवडल्याचे बोलले जात आहे. मात्र ते आधीच शिंदे गटात जाणार होते. मात्र त्यांच्या मुलांने ठाकरे गटात राहण्याचा आग्रह केल्याने ते थांबले होते.

त्यानंतरही ते ठाकरेंवर नाराज असल्याच्या अनेकदा चर्चा झाल्या होत्या. मात्र त्यांनी ठाकरेंसोबतच आपण राहणार असल्याचे वारंवार स्पष्ट केलं होतं. परंतु आज त्यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

योगायोग म्हणजे कालच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांची कारागृहातून सुटका झाली आणि आज कीर्तिकरांनी ठाकरेंची साथ सोडली. यामुळे देखील जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जेष्ठ नेते किर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार असून ते १९९० ते २००९ काळात ते चार वेळा आमदार देखील राहीले आहेत. युती सरकारमध्ये त्यांनी गृहराज्यमंत्री म्हणून काम केले आहे. तर सलग दोन वेळा लोकसभा खासदार म्हणून ते निवडूण आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com