
Shivsena News : माजी मंत्री दीपक सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत बाळासाहेब भवन येथे शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री सुभाष देसाई यांचे चिरंजीव भूषण देसाई यांनी दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यानंतर आता दीपक सावंत यांनीही प्रवेश केल्यामुळे ठाकरेंना धक्यावर धक्के बसत आहेत.
महायुती सरकार असताना सावंत यांनी आरोग्य खाते सांभाळले होते. तसेच २००६ आणि २०१२ मध्ये ते विधानपरिषदेत आमदार होते. २०१४ मध्ये भंडारा आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे जाबादारी होती. मात्र, आज त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसनेते प्रवेश केला.
या प्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना आपण ठाकरेंना का सोडलं? तसेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत का प्रवेश केला? याचे कारण सांगितले आहे.
दीपक सावंत म्हणाले, ''मला सामाजिक कार्यात रस आहे. त्यासाठी पाठीमागे पक्षाचा पाठिंबा असणे आवश्यक आहे. तसेच मला काम द्या, असे साधारण वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होतं. मात्र, त्यावर कोणतेही उत्तर आलेले नाही. त्यामुळे काम करण्यासाठी शिवसेनेत प्रवेश करत आहे'', असं ते यावेळी म्हणाले.
''शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मला खूप काही दिलं. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी मला रिटायर केलं. मला मंत्रीपद नको मला काम हवं आहे, यासाठी उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं होतं. पण त्यावर कोणतंही उत्तर त्यांनी दिलं नाही, असं म्हणत दीपक सावंत हळहळले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.