शिंदे गटाला बालेकिल्ल्यातचं पहिला धक्का : शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश!

Shivsena : रागिणी भास्कर शिवसेनेच्या ठाण्यातील पहिल्या महिला नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात.
Thane Shivsena Latest News
Thane Shivsena Latest NewsSarkarnama

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना त्यांच्या ठाण्याच्या बालेकिल्ल्यातच मोठा धक्का दिला आहे. ठाण्याच्या माजी नगरसेविका रागिणी भास्कर वेरिशेट्टी यांच्यासह शेकडो शिवसैनिक कार्यकर्त्यांचा काही दिवसांपूर्वीच शिंदे गटात प्रवेश केला होता. रागिणी शेट्टी आधी शिंदे गटात साामील झाल्या होत्या. आता मात्र शेट्टी यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात जाणार आहेत.

Thane Shivsena Latest News
मुख्यमंत्र्यांना पत्र देऊनही `तो` अभियंता निर्धास्त!

मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यातीलच शेकडो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यामुळे, आता शिंदे यांना हा जबरदस्त धक्का मानला जातो. रागिणी भास्कर शिवसेनेच्या ठाण्यातील पहिल्या महिला नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी त्यांनी हातात शिवबंधन बांधलं आहे. यावेळी भास्कर वेरिशेट्टी, साहिल वेरिशेट्टी इत्यादी शिवबंधन बांधले.

यावेळी शिवसेना उपनेत्या अनिताताई बिर्जे, खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, ओवळा माजिवडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख , ठाणे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर, ठाणे जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर आणि इतरही अनेक कार्यकर्ते, शिवसैनिक उपस्थित होते.

Thane Shivsena Latest News
शिंदे गटाला बालेकिल्ल्यातचं पहिला धक्का : शंभरहून अधिक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला मोठी गळती लागली होती. शिंदे गटात सुरूवातीला ४० आमदार, त्यानंतर १२ खासदार आणि आता थेट विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात दाखल झाले होते. मात्र, आता शिंदे यांना या माध्यामातून जोरदार उत्तर देण्याचे खेळी दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com