Anganwadi Sevika
Anganwadi SevikaSarkarnama

Anganwadi Sevika: अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा; राज्य सरकारने मानधनात केलेली वाढ जुलैपासून मिळणार!

Mangal Prabhat Lodha : अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली महत्वाची माहिती

Mumbai : राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. त्यानंतर आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना राज्य सरकारने केलेल्या मानधनातील वाढ ही जुलैपासून मिळणार असल्याचं महिला व बालकल्याण मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगिलं आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला. पण वाढ होऊनही गेली दोन महिने मानधनात कोणतीच वाढ झाली नव्हती. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्माऱ्यांनी निराशा व्यक्त केली होती. अखेर आता जुलैपासून मानधन वाढ मिळणार असल्याने अंगणवाडी सेविकांना दिलासा मिळणार आहे.

Anganwadi Sevika
Ahmednagar News: नामांतराला विरोध करणाऱ्या विखे-पाटलांवर नामांतराची घोषणा झाल्यावर आभार मानण्याची वेळ

अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने १ एप्रिल २०२३ ला घेतला होता. या निर्णयानुसार अंगणवाडी सेविकांना १० हजार आणि मिनी अंगणवाडी सेविकांना सात हजार २०० तर अंगणवाडी मदतनीसांना पाच हजार ५०० रुपये मानधन देण्यात येणार होते.

या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी केंद्र सरकारचा हिस्सा ६० टक्के व राज्य सरकारचा हिस्सा ४० टक्के असे प्रमाण आहे. पण त्यानंतर याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे वाढीव मानधन लवकरात लवकर मिळावे, यासाठी आग्रही होत्या.

Anganwadi Sevika
Chaundi Politics : चौंडीतील जयंतीसोहळ्यातून गुरुला जमलं नाही ते शिष्यानं करून दाखवलं !

अखेर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात राज्य सरकारने केलेली वाढ जुलै महिन्यापासून सुरळीत मिळणार असल्याचं मंगल प्रभात लोढा यांनी सांगितलं. शासनाने जरी १ एप्रिल २०२३ पासून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय जरी घेतला असला तरी या वाढलेल्या खर्चाची पुढील महिन्यात तरतूद करणार आहोत. त्यामुळे जुलै महिन्यापासून वाढलेल्या मानधनाची अमंलबजावणी करण्यात येईल, असं मंगल प्रभात लोढा म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com