Thackeray vs Shinde : ठाकरे, शिंदेंना देणार धक्का?; नाराज आमदारांना परत फिरवण्यासाठी हालचाली...

Maharashtra Politics News : उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील काही नाराज आमदारांना परत येण्याची हाक दिल्याची चर्चा
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama

Shivsena News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटातील काही नाराज आमदारांना परत येण्याची हाक दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

एकनाथ शिंदे शिवसेनेतील 40 आमदार आणि अपक्ष 10 असे मिळून 50 आमदारांना घेऊन गेले. त्यानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. पण यामध्ये शिंदे गटातील 40 आमदारांपैकी फक्त 10 आमदारांनाच मंत्रीपद मिळाले. अपक्ष आमदारांना कोणतेही पद मिळालेले नाही.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Nitesh Rane vs Uddhav Thackeray : नितेश राणेंचा कोकणात उद्धव ठाकरेंना धक्का; 'येथील' नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश

राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यामुळे इतर आमदार अजून वेटिंगवरच आहेत. तर काही आमदारांना आपल्याला निदान महामंडळाची जबाबदारी तरी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही झालेले नाही. त्यामुळे शिंदेंच्यासोबत असलेले काही आमदार नाराज असल्याची चर्चा अधून-मधून होत असते. आमदार संजय शिरसाट यांच्या अनेकांनी मंत्रीपद न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. तर अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी मंत्रीपद मिळाले नाही म्हणून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
State Government News : राज्य सरकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावरच जबाबदारी ढकलत आहे !

दुसरीकडे शिंदे गटातील बोटावर मोजण्याइतके आमदार सातत्याने उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात. पण बाकीचे आमदार काहीही बोलत नाहीत. त्यामुळे ठाकरेंवर टीका न करणारे आणि शिंदे गटात नाराज असलेल्या काही आमदारांना पुन्हा परत येण्यासाठी ठाकरे गळ घालत असल्याची चर्चा आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे स्वता: मैदानात उतरले आहेत. त्यांनी राज्यभरात सभांचा सपाटा लावला आहे. त्यांच्या सभांना होणारी गर्दी आणि मिळणारी सहानुभूती यामुळे शिंदे गटात अस्वस्थता असल्याचेही सांगितले जात आहे. नाशिकच्या मालेगाव, दापोली आणि जळगावच्या पाचोऱ्यामध्ये ठाकरेंच्या सभांना मोठी गर्दी झाली.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Amravati APMC Election : ठाकुरांच्या माजी संचालकांचा राणांच्या छावणीत आश्रय, अमरावतीत कडवी झुंज !

अशातच शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या काही आमदारांना मात्र, आपण पुन्हा निवडून येऊ की नाही याबाबत शांशकता आहे. त्यामुळे काही आमदार पुन्हा एकदा स्वगृही परतण्याच्या मनस्थितीत आहेत का? याची चाचपणी ठाकरे करत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल कधीही जाहीर होऊ शकतो. या निकालानंतर राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ठाकरे हे आतापासूनच हालचाली करत असून बंड केलेल्या आमदारांना ते परत येण्यासाठी गळ घालत, असल्याचे बोलेल जात आहे.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com