मोठी बातमी : मविआ नेत्यांची सुरक्षा केली कमी मात्र मिलिंद नार्वेकरांच्या सुरक्षेत वाढ

Mahavikas Aghadi : मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा वाढवल्याने चर्चांना उधाण...
eknath shinde, Milind Narvekar Latest News
eknath shinde, Milind Narvekar Latest Newssarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने महाविकास आघाडीला पुन्हा दणका दिला आहे.

महाविकास आघाडीतील बहुतांश नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. परंतू माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षा कायम ठेवण्यात आली असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर यांची सुरक्षा मात्र वाढविण्यात आली आहे. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. (Eknath shinde, Milind Narvekar Latest News)

eknath shinde, Milind Narvekar Latest News
कुख्यात गुंड गज्या मारणेला न्यायालयीन कोठडी...

महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने आज घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री धनंजय मुंडे, नवाब मलिक, छगन भुजबळ, वरुण सरदेसाई, नितीन राऊत, सतेज पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत यांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली आहे.

eknath shinde, Milind Narvekar Latest News
चंद्रकांत खैरे म्हणाले, बच्चू कडूंनी आता माघार घेऊ नये, तर खडसे म्हणतात, शिंदेंनाच माहीत!

दरम्यान, राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून मिलिंद नार्वेकर यांनी अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. नार्वेकर हे शिंदे गटात जाणार अशा चर्चा वारंवार होत असतात. या पार्श्वभूमीवर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांची सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याउलट नार्वेकर यांच्या सुरक्षितेत वाढ करण्यात आल्याने अनेक तर्कवितर्क लढवले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in