
Sanjay Raut: मुंबईतील शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात बाजवलेलं अजामीनपात्र वॉरंट रद्द केलं आहे. राऊत सुनावणीला हजर राहत नसल्याने त्यांना न्यायालयाने अटक वॉरंट जारी केलं होतं. पण अटक वॉरंट जारी केल्यानंतर राऊतांनी तातडीने न्यायालयात हजर राहात ते रद्द करुन घेतलं.
संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यांवर 100 कोटींचा सार्वजनिक शौचालय घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्याविरोधात मेधा सोमय्यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. या याचिकेवर आज न्यायालयात सुनावणी पार पडली. पण संजय राऊत वारंवार अनुपस्थित राहिल्यानं दंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी राऊतांविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावलं. तसेच, मेधा सोमय्या यांचा जबाब नोंदवून घेतला. आता या याचिकेवरील पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी निश्चित केली आहे.
संजय राऊत यांनी १०० कोटींच्या शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा सोमय्या आणि किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले होते. यावर मेधा सोमया यांनी त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. त्यावरुन मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांना नोटीस बजावली होती. ४८ तासांत माफी मागा अन्यथा अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा सोमय्या यांनी दिला होता. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावा केला आहे.
काय आहे १०० कोटी शौचालय घोटाळा प्रकरण ?
मुंबईतील मिरा भाईंदरमध्ये एकूण 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली आहेत. किरीट सोमय्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला यातील 16 शौचालये बांधण्याच कंत्राट देण्यात आलं होतं. पण मेधा सोमय्या यांनी बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना फसवून महापालिकेकडून साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतली, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
महाविकास आघाडीत असताना आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील विधानसभेत हा मुद्दा उपस्थित केला होता. या प्रकरणाची तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मीरा भाईंदरमध्ये ज्या ठिकाणी शौचालय बांधण्यात आलेल्या जागांची पाहणी वनविभागाने सुरु केली होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.