मोठी बातमी : राहुल शेवाळेंच्या गटनेतेपदी नियुक्तीला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता

Loksabha|Om Birla : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १२ खासदारांनी बिर्ला यांची भेट घेतली होती.
Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News
Rahul Shewale News in Marathi, Shiv sena NewsSarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचे 12 समर्थक खासदाराच्या गटाला आणि राहुल शेवाळे यांच्या गटनेतेपदाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली आहे. यामुळे शिवसेनेला (Shivsena) पुन्हा एक मोठा धक्का बसला आहे. आज (ता.19 जुलै) शिंदे गटाच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (OM Birla) यांची भेट घेऊन नवीन गटनेत्याच्या नियुक्तीबाबत पत्र दिलं होतं. यास बिर्ला यांनी मान्यता दिल्याची माहिती मिळत आहे. (Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News)

Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News
राज्यात सध्या सर्कस सुरु झाली मात्र गद्दार हा गद्दारच असतो : आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

शिंदे यांच्यासह ४० आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेचे १२ खासदारांनीही दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटात सामील झाल्याची घोषणा केली आणि आपण एनडीएचा भाग असल्याचं त्यांनी सांगितलं होते. दरम्यान आता या शिंदे गटाला खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी हिरवा कंदील दाखवल्याने शिवसेनेला मोठा हादरा बसला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १२ खासदारांनी बिर्ला यांची भेट घेऊन विनायक राऊत यांच्या जागी राहुल शेवाळे यांची सभागृहात पक्षनेतेपदी नियुक्ती करण्याची विनंती केली होती. त्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते आता राहुल शेवाळे राहणार असून प्रतोद म्हणून भावना गवळी कायम राहणार आहे.

Rahul Shewale News in Marathi, Shiv sena News
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीकडून अटक

दरम्यान, शिवसेनेला शिंदे यांच्याकडून धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. उद्या 16 बंडखोर आमदारांच्या आपात्रतेबाबतच्या शिवसेनेने दाखल केलेल्या याचीकेवर सर्वोच्च न्यायालयात काय निकाल लागतो. याकडे शिवसेनेचे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com