मोठी बातमी ! नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती पुढे ढकलली

Police Recruitment | प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे.
PSI recruitment scam
PSI recruitment scamsarkarnama

Police Recruitment मुंबई : एक नोव्हेंबर २०२२ पासून सुरु होणारी पोलीस भरती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राज्यभरात तब्बल 14,956 पदांसाठी ही भरती होणार होती. पण या भरतील तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. पुढील आठवड्यात या भरतीबाबत नव्याने निर्णय घेण्यात येणार आहे. यासोबतच राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई पदासाठई होणारी भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीला तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्यात पोलीस भरती झालेली नाही. त्यातच वयोमर्यादा संपल्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणारे अनेक उमेदवार भरतीसाठी पात्र नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी आणि त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये, यासाठी थोड्या कालावधीसाठी ही भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे सरकारकडून कळतेय. त्यामुळे नव्या पोलीस भरतीच्या जाहिरातीत वयोमर्यादा वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

PSI recruitment scam
कंगना रानौतचं ठरलं ; 2024 ला 'या' मतदार संघातून लढवणार निवडणूक

राज्यभरातील हजारो तरुण या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत. काही तरुणांनी तर पोलीस भरतीसाठी आंदोलनही केलं होतं. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस भरतीची परीक्षा लवकरच जाहीर करण्याच आश्वासन दिलं होतं. फडणवीसांच्या आदेशानुसार राज्यात 14 हजार 956 जागांसाठी पोलीस भरती जाहीर करण्यात आली. पण पोलीस भरतीची घोषणा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही पोलीस भरती पुढे ढकलण्यात आली आहे.

येत्या १ नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात होणार होती, त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांध्ये उत्साहाचे वातावरण होते. पण आता त्यांचा हिरमोड झाला आहे. पोलीस महासंचालक कार्यालयाने याबाबत एक प्रसिद्धपत्रक जाहीर केलं आहे.यात प्रशासकीय कारणास्तव पोलीस भरती स्थगित करण्यात आले असून नवी जाहीरात लवकर जाहीर करण्यात येईल, असं प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in