Shivsena : मोठी बातमी! शिवसेनेच्या मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड

Eknath Shinde : या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama

Maharashtra Politics : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेनेची पहिली राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसेच यापुढे शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील, असा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच शिवसेना कार्यकारणीच्या या बैठकीत अजून काही महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

Eknath Shinde
Patan : शंभूराज देसाईंच्या मेळाव्यात 273 जणांना मिळाली नोकरी....

शिवसेना कार्यकारणीत कोणते मोठे निर्णय झाले?

- एकनाश शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी म्हणून निवड करण्यात आली.

- शिवसेना पक्षाचे सर्व अधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असतील.

- चर्चगेट रेल्वे स्टेशनला माजी केंद्रीय मंत्री चिंतामणराव देशमुख यांचे नाव देण्याचा निर्णय.

- राज्यातील भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरी देणे.

- सर्व प्रकल्पात भूमीपूत्रांना ८० टक्के नोकरीमध्ये स्थान देण्याचा निर्णय.

- मराठी भाषेला अभीजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न.

- UPSC आणि MPSC च्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देण्याचा निर्णय.

- स्वातंत्र्यवीर सावकरकरांना 'भारतरत्न' देण्यासाठी प्रयत्न. खासदार राहुल शेवाळे यांनी सर्वात प्रथम लोकसभेत ही मागणी केली होती.

Eknath Shinde
Who Is Gangster Raja Thakur : राऊतांनी आरोप केलेला ठाण्यातील गुंड आहे तरी कोण? : खूनप्रकरणी जन्मठेप; २०१९ पासून जामीनावर

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेंना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यानंतर संजय राऊत यांनी काही आक्षेपाहार्य वक्तव्य केली होती. याबाबत आजच्या कार्यकारणीच्या बैठकीत निषेधाचा ठराव करण्यात आला.

तसेच आगामी निवडणुकीमध्ये भाजप-शिवसेना युती करून लोकसभेच्या निवडणुकीत 45 तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात आला.

Eknath Shinde
Eknath Shinde : आघाडी, युतीच्या दिग्गज नेत्यांमुळे वाढली प्रचारातील शेवटच्या टप्यात रंगत

दरम्यान, शिवसेना मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवर आले असून या पार्श्वभूमीवरच आज राष्ट्रीय कार्यकारणीची महत्वाची बैठक मुंबईत पार पडली. तसेच शिवसेनेची पुढची वाटचाल कशी असेल? या विषयावर चर्चा झाली असून एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मुख्यनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com