Phone Tapping Case : रश्मी शुक्लांच्या विरोधात ७०० पानांचे आरोपपत्र दाखल

या आरोप पत्रामध्ये जवळपास २० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत.
Phone Tapping Case : रश्मी शुक्लांच्या विरोधात ७०० पानांचे आरोपपत्र दाखल
Rashmi Shuklasarkarnama

मुंबई : आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्याविरुद्ध फोन टॅपिंग प्रकरणात (phone tapping case) मुंबईच्या कुलाबा पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईच्या मुख्य दंडाधिकारी (किल्ला) न्यायालयात आज (ता. २६ एप्रिल) ७०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये जवळपास २० साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. (Big news : 700 page chargesheet filed against Rashmi Shukla in phone tapping case)

विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या काळात रश्मी शुक्ला यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री, ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले आहेत. ज्या वेळी नाना पटोले यांचा फोन टॅप करण्यात आले, त्यावेळी ते आणि खडसे हे भाजपमध्ये होते. या प्रकरणावरून राज्यात मोठा गदरोळ उडाला होता. या प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखविण्यात आले होते.

Rashmi Shukla
...पण तुम्ही ‘गधा’दारी नक्की आहात : फडणवीसांची ठाकरेंवर शेलक्या शब्दांत टीका

या आरोपपत्रात जवळपास २० साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले असून त्यात बहुतांश सर्व सरकारी कर्मचारी आहेत. या आरोपपत्रात सुमारे ६ सरकारी कर्मचाऱ्यांच्या जबाबांचा समावेश असून, सीआरपीसी कलम १६४ अंतर्गत त्यांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. या सहा सरकारी कर्मचाऱ्यांपैकी एक त्यावेळी एसीएस होम एस कुमार आहेत. याशिवाय, त्यावेळेस एसआयडीमध्ये एक डीवायएसपीदेखील तैनात होते.

Rashmi Shukla
हर्षवर्धन पाटलांच्या खंद्या समर्थकाचा राष्ट्रवादीत प्रवेश

या आरोपपत्रात खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जबाबांचाही समावेश करण्यात आला आहे. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर जेव्हा महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले नव्हते. त्या वेळी महाविकास आघाडी स्थापनेची प्रक्रिया सुरू होती. त्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा फोन तब्बल ६० दिवस टॅप करण्यात आला होता.

Rashmi Shukla
मित्राच्या मुलाच्या घरी स्नेहभोजन घेत नितीन गडकरींनी जपली मैत्री!

त्याचवेळी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोन ६७ दिवस टॅप करून दोघांचे फोन टॅप करण्यासाठी ‘एसआयडी’कडून एसीएसच्या घरी पाठवलेल्या पत्रावर बनावट नावे नमूद करण्यात आली होती. संजय राऊत यांच्यासाठी ‘एस रहाटे’ आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी ‘खडसणे’ हे नाव वापरण्यात आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.