Disha Salian Case : आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार? दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा

Disha Salian Case : 'दिशा सालियन मृत्यू प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही'
Disha Salian Case
Disha Salian Case Sarkarnama

Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले नव्हते, त्यामुळे या प्रकरणाचा कोणताही तपास सीबीआयने केला नाही, असा मोठा खुलासा आता सीबीआयकडून करण्यात आला आहे. तसेच 'सीबीआयचा निष्कर्ष' अशा आशयाच्या बातम्या देखील खोट्या असल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून यामध्ये दिशा सालियन मृत्यू प्रकरण चांगलच गाजलं आहे. या प्रकरणाची चौकशी एसआयटी मार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा देखील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. दोन दिवसांपूर्वी लोकसभेत शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर अभिनेता सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन प्रकरणाचा उल्लेख करत गंभीर आरोप केले होते.

Disha Salian Case
Danve-Sattar News : दानवेंसोबत जेवणाच्या टेबलावर सत्तारांकडून मुलाच्या आमदारकीसाठी फिल्डिंग ?

त्यानंतर हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं. त्यानंतर दिशा सालियन प्रकरणाच्या चौकशीची मागणी भाजप (BJP) नेत्यांनी केली. तसेच दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी देखील करण्यात आली होती. मात्र या सर्व प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केली.

Disha Salian Case
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल महाराष्ट्रात १० दिवस तळ ठोकणार; पण...

दरम्यान, दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांवर बोलताना त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. तर दिशा सालियन मृत्यू प्रकरण सीबीआयने कधीही हाताळले नाही, हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात आले नव्हते, त्यामुळे या प्रकरणाचा कोणताही तपास सीबीआयने (CBI) केला नाही, असा खुलासा सीबीआयने केला आहे.

दरम्यान, सीबीआयच्या या स्पष्टीकरणाने आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com