भुजबळसाहेब, आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान : फडणवीसांच्या विधानाने चर्चेला उधाण

महाराष्ट्राच्या इतिहासात एकनाथ शिंदे हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत.
Chhagan Bhujbal-devendra Fadnavis
Chhagan Bhujbal-devendra FadnavisSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राच्या इतिहासात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत. पण, त्याच्यामध्येही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच (महाराष्ट्रात) आहे. पण, सफेद दाढीचा प्रभाव संपूर्ण हिंदुस्थानभर आहे, अशा शब्दांत माजी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासदर्भात भाष्य केले. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिले. भुजबळसाहेबांनी लोकसभेतील भाषण विधानसभेत केलं. पण काही हरकत नाही. आमच्याकडे पांढऱ्या दाढीचा फार सन्मान आहे, असे फडणवीस म्हणाले. (Bhujbalsaheb, we have great respect for the white beard : Devendra Fadnavis)

पावसाळी अधिवशेनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधकांनी प्रश्नोत्तराच्या तासात आज सकाळीच आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना धारेवर धरले. जीएसटीच्या संदर्भातील बिलावरही या वेळी चर्चा झाला. त्यावेळी भुजबळांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला अर्थमंत्रिपद सांभाळणारे फडणवीस यांनी उत्तर दिले. त्यावेळी त्यांनी पांढऱ्या दाढीबाबत भाष्य केले. विशेष म्हणजे भुजबळांचीही दाढी पांढरी आहे, त्यामुळे फडणवीसांनी भुजबळांना भाजपमध्ये येण्याचे आमंत्रण तर दिलेले नाही ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Chhagan Bhujbal-devendra Fadnavis
शिंदे, फडणवीस, अजितदादांनाच दोन माईक का? : शेलार; पवार म्हणाले ‘आमचा एक माईक दिल्लीला जातो’

भुजबळ म्हणाले की, येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसलेले आहेत. तुम्ही मुख्यमंत्री झालात, याचा मला तर फार आनंद आहे. आपल्याकडे बघून मला फार कौतुक वाटतं. मला आनंद वेगळाच आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासात हे पहिले दाढीवाले मुख्यमंत्री झाले आहेत. पण त्याच्यामध्येही सफेद दाढी आणि काळी दाढी हा फरक आहे. काळ्या दाढीचा प्रभाव इकडेच (महाराष्ट्रात) आहे. पण, सफेद दाढीचा प्रभाव संपूर्ण हिंदुस्थानभर आहे, अशा शब्दांत भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासदर्भात भाष्य केले.

Chhagan Bhujbal-devendra Fadnavis
राहुल, इथंपण तू आडवा का मला? : अजितदादांनी घेतली आमदार कुलांची फिरकी!

अर्थमंत्रिपद सांभाळणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अत्यंत मार्मिक शब्दांत छगन भुजबळ यांना उत्तर दिले. ते म्हणाले की, भुजबळसाहेब, हे लोकसभेतील भाषण होतं, ते तुम्ही विधानसभेत केलं. पण हरकत नाही, तुम्ही ज्येष्ठ आहात, त्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माफी आहे. त्यामुळे लोकसभेतील भाषण तुम्ही निश्चितपणे विधानसभेत करू शकता. पण, पांढऱ्या दाढीचा आमच्याकडे फार सन्मान आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com