भोंगा वाद : सर्वपक्षीय बैठकीवर रिपब्लिकन पक्षाचा बहिष्कार...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे RPI कोणीही प्रतिनिधी No One members या सर्वपक्षीय बैठकीत In an all-party meeting सामील होणार नसल्याचे सांगण्यात आले आहे.
भोंगा वाद : सर्वपक्षीय बैठकीवर रिपब्लिकन पक्षाचा बहिष्कार...
Republican Party Of Indiasarkarnama

मुंबई : राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करत भोंग्यांबाबत उद्भवलेल्या वादाबाबत राज्य शासनातर्फे आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीवर आज रिपब्लिकन पक्षाने बहिष्कार टाकला.

याबाबतचे पत्र रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, युवक आघाडी मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड सुमित वजाळे या तिन्ही नेत्यांनी आज प्रसिद्धीस दिले आहे. यापत्रात म्हटले की, मशिदीवरील भोंगे हटवा असे सांगत विशिष्ट समाजाला भीती दाखविणे. अजानच्या वेळी हनुमान चालीसा म्हंटली जाईल, अशी धमकी देऊन वातावरण बिघडविले जात असताना ते रोखण्याचे सोडून सर्वपक्षीय बैठक आयोजित करणे चुकीचे असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाने सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घातला आहे.

Republican Party Of India
रामदास आठवले म्हणाले, नाना पटोले डॅशींग; दिली ‘ही’ ऑफर...

राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचा आरोप करीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षातर्फे कोणीही प्रतिनिधी या सर्वपक्षीय बैठकीत सामील होणार नसल्याचे सांगत सर्वपक्षीय बैठकीवर रिपब्लिकन पक्षाने बहिष्कार टाकला असल्याची म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.