शिवसेनेत वाद पेटला : महिला शिवसैनिकांकडून शहरप्रमुखाला शाखेतच मारहाण

या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
शिवसेनेत वाद पेटला : महिला शिवसैनिकांकडून शहरप्रमुखाला शाखेतच मारहाण
Shivsena Sarkarnama

भाईंदर : शिवसेना (shivsena) शाखेतच शहरप्रमुखाला महिला शिवसैनिकांकडून मारहाण करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी एकमेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. (Bhayander's shivsena city chief was beaten by female Shiv Sainiks)

भाईंदर पश्चिमचे शहरप्रमुख पप्पू भिसे हे आज (ता. १७ एप्रिल) दुपारी पोलिस ठाण्याच्या समोर असणाऱ्या शिवसेनेच्या शाखेत बसले होते. येथील काही जणांचा पक्षप्रवेश शिवसेनेचे संपर्कप्रमुख, आमदार प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आला होता. शिवसेनेच्या माजी महिला शहर संघटक वेदाली परळकर यांना याचा राग आला होता. शहरप्रमुख भिसे शाखेत बसलेले असताना परळकर सात ते आठ महिलांसह शाखेत आल्या होत्या. पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आपल्याला न सांगता कसा केला, असे विचारून परळकर आणि इतर महिलांनी त्यांना मारहाण केली. या वेळी कपडेही फाडण्यात आले, तसेच काळे फासण्याचाही प्रयत्न झाला, असे भिसे यांनी म्हटले.

Shivsena
'चंद्रकांत पाटलांनी २०१९ मध्ये केलेल्या दगाफटक्याचा शिवसैनिकांनी बदला घेतला'

दुसरीकडे वेदाली परळकर यांनीही पप्पू भिसे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिला बचत गटाच्या कामानिमित्त काही महिला भेटण्यासाठी येणार असल्यामुळे परळकर शाखेत गेल्या होत्या. भिसे हे त्या आल्याचे पाहून बाहेर गेले होते, त्यामुळे त्या त्यांच्या खुर्चीवर बसल्या. या गोष्टीचा राग आल्यामुळे भिसे यांनी आपल्याला शिवीगाळ केली आणि विनयभंग केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक एम. बी. पाटील यांनी दिली.

Shivsena
शिवाजी महाराजांच्या बदनामीच्या कटात राज ठाकरेंचा सहभाग : शिवचरित्र अभ्यासकाचा आरोप

पदावरून वाद वाढला

वेदाली परळकर यांच्यासह अनेकांना काही महिन्यांपूर्वी शिवसेनेची पदे देण्यात आली होती. पण, या नेमणुका शिवसेना पक्षप्रमुखांची मान्यता न घेताच झाल्याची तक्रार संपर्कप्रमुख आमदार प्रताप सरनाईक यांनी केल्यामुळे या सर्व नेमणुका रद्द करण्यात झाल्या होत्या. तेव्हापासून भिसे आणि परळकर यांच्यात धुसफूस सुरू होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.