आमदारांनंतर खासदांकडूनही दबाव वाढला: भावना गवळींची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

Eknath Shinde news update| राज्यात सद्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केले आहे.
आमदारांनंतर खासदांकडूनही दबाव वाढला: भावना गवळींची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणि अपक्ष असे एकूण 34 आमदार आहेत. सद्या ते सर्व आसाम, गुवहाटी येथे आहेत. राष्ट्रवादी-कॉंग्रेसशी घरोबा नको, भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात येत आहे.

शिंदेंच्या बंडानंतर आता शिवसेना नेते दिपक केसरकर आणि शिवसेना खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्राद्वारे बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार करा,अशी विनंती केले आहे.

आमदारांनंतर खासदांकडूनही दबाव वाढला: भावना गवळींची मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे मागणी
विनोद निकोले म्हणाले, मी महाविकास आघाडी बरोबरच...

भावना गवळींचे पत्र

''आपल्या सेवेशी नम्रपणे निवेदन करते की. सद्यस्थितीत निर्माण झालेल्या राजकीय परिस्थीतीमुळे आपण व्यतिथ झाला आहात. पक्षापुढे अचानकपणे आलेल्या संकटामुळे आपणासमोर खुप मोठे आव्हाण असल्याची मला कल्पना आहे. एक शिवसैनिक म्हणून माझ्या मनातही याची खंत आहे.

आपल्या पक्षातील मावळे आमदार हिंदुत्वाच्या मुद्यावर आपणास एक मोठा निर्णय घेण्याकरीता विनंती करीत आहेत. हे सर्व शिवसेनेचे शिलेदार प्रथमतः हाडामासाचे शिवसैनिकच आहेत. त्यांच्या भावना समजून आपण त्यांच्यावर कुठलीही कठोर कार्यवाही न करता कठीन असला तरी शिवसेनेकरीता निर्णय घ्यावा, ही विंनती करते.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी नुकत्याचं केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये बंडखोर आमदारांना परत येण्याची साद घातली आहे. सुरतला जाऊन बोलण्यापेक्षा समोर येऊन बोला, मी आत्ता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यायला तयार आहे. मी शिवसेना प्रमुखाचा मुलगा, मी मला कोणताही मोह नाही. तुम्ही बोललात तर मी शिवसेना पक्षप्रमुख पदही सोडायला तयार आहे. ही बाळासाहेबांची शिवसेना नाही, अशी बातमी पसरविण्यात आली. २०१४ ला एकट्याच्या ताकदीवर ६३ आमदार शिवसेनेचे निवडून आले ती पण हिंदुत्वावर. शिवसेना कुणाची बाळासाहेबांची पण मधल्या काळात जे मिळाले ते याच शिवसेनेने मिळवले, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in