"महाराष्ट्र तुम्हाला सांभाळता आला नाही आणि बिहार दौरा करायला निघाले..''

MP Bhavana Gavali : आम्हाला गद्दार म्हणता, मात्र तुम्हीच खरे गद्दार आहात...
MP Bhavana Gavali Latest news
MP Bhavana Gavali Latest newsSarkarnama

आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. खरे गद्दार कोण आहे हे सर्वांना दिसले आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार देखील विकलेले नाही. आमचीच शिवसेना खरी असून आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे अशी घणाघाती टीकाही गवळींनी ठाकरे गटावर केली आहे. ( Bhavna Gavali Latest News)

MP Bhavana Gavali Latest news
Bhagat Sing Koshyari : राज्यपालांना उपरती? आधी छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान, आता गौरवोद्गार!

महाराष्ट्र राज्य तुम्हाला सांभाळता आलं नाही आणि बिहार दौरा करायला निघाले. पहिले आपले घर सांभाळा नंतर बिहार दौरा करा अशी बोचरी टीका शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी केली आहे. तसेच तुम्ही आमच्यावर गद्दार, गद्दार म्हणून आरोप करता पण तुम्हालाच आम्हांला सांभाळता आलं नाही. त्यामुळे खरे गद्दार तर तुम्ही आहात असा हल्लाबोलही गवळी यांनी यावेळी केला आहे.

गवळी म्हणाल्या; मी मुंबईकडे निघण्यासाठी गाडी पकडत असताना माझ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तिथे विनायक राऊत आणि नितीन देशमुख हे रेल्वे स्थानकावर 100 जणांसह उभे होते. त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावण्याचे आणि माझ्या अंगावर पाठवण्याचे काम केलं. यामुळे माझा जीवही गेला असता. त्यामुळे विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी. तसेच याबाबत महिला आयोग, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही तक्रार करणार आहे असेही गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले.

MP Bhavana Gavali Latest news
Aditya Thackeray Visit to Bihar: आदित्य ठाकरे यांचा बिहार दौरा, पाहा फोटो!

आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. खरे गद्दार कोण आहे हे सर्वांना दिसले आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार देखील विकलेले नाही. आमचीच शिवसेना खरी असून आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे अशी घणाघाती टीकाही गवळींनी ठाकरे गटावर केली आहे. ( Bhavna Gavali Latest News)

MP Bhavana Gavali Latest news
Satara : राज्यपालांचे नाव काढताच पृथ्वीराज चव्हाणांनी जोडले कोपरापासून हात

लालूप्रसाद यादव यांनी तर हिंदुत्वाला विरोध केला होता आणि आता आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना का भेटायला जात आहेत असा सवाल देखील गवळी यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गटात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in