Bhaubij 2022 Special : भारतीय राजकारणातील प्रसिद्ध भाऊ-बहिणींची जोडी!

Bhaubij 2022 Special : भारतीय राजकारणातील काही भावंडांचा घेतलेला आढावा.
Bhaubij 2022 Special
Bhaubij 2022 SpecialSarkarnama

Bhaubij 2022 Special : भारतीय राजकारणात सुरुवातीपासूनच अनेक भाऊ-बहीण जोडी आणि भावंडांची अगदी त्रिकूट सुद्धा पाहिले आहे.काही भावंडाच्या जोड्या अतिशय प्रसि्द्ध आहेत. तर काही फारसे प्रकाशझोतात नसतात. काही भावंडं एकाच पक्षात सहकारी म्हणून काम करतात, तर काहींनी एकाच कुटुंबात जन्म घेऊनही आपले वेगवेगळे राजकीय मार्ग निवडले आहेत.

भावंडांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायाचा वारसा पुढे चालवतात, यात काही विशेष गोष्ट नाही. भारतीय राजकारणातही हीच प्रथा आहे जिथे प्रियंका आणि राहुल गांधी आणि कन्मिमोझी आणि एमके स्टॅलिन यांसारखे भाऊ-बहीण त्यांचा राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम करत आहेत.

भाऊबीज हा सण आज आणि उद्या भारतात मोठ्या उत्सवातत साजरा केला जातो. भारतीय राजकारणातील काही भावंडांवर घेतलेला आढावा :

राहुल आणि प्रियांका गांधी :

जेव्हा राजकारणातील भावंडांचा उल्लेख केला जातो, तेव्हा काँग्रेस पक्षाचे गांधी भावंड उल्लेख प्राधान्याने येतो. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत आणि काँग्रेसचे माजी अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. काँग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी हे भारताचे माजी पंतप्रधान राजीव आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांची मुले आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकमेकांसोबत ते भक्कमपणे उभे आहेत.

राहुल गांधी 2004 सालापासून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्य़े (INC) ते सक्रीयपणे कार्यरत आहेत. तर प्रियांका याच वर्षी राजकीय संघर्षात सहभागी झाल्या आहेत.

Bhaubij 2022 Special
मल्लिकार्जुन खर्गे अॅक्शन मोडवर; अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच मोठी घोषणा

कनिमोळी आणि एमके स्टॅलिन :

दिवंगत नेते एम करुणानिधी यांची मुले कनिमोझी आणि एमके स्टॅलिन हे द्रविड मुनेत्र कळघम (डीएमके) पक्षाचे नेतृत्व करत आहेत. एमके स्टॅलिन हे तामिळनाडूचे सातवे आणि विद्यमान मुख्यमंत्री आहेत. ते तामिळनाडू विधानसभेत पाच वेळा आमदार आणि तामिळनाडूचे एकेकाळचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत, तर कनिमोझी थुथुक्कुडी येथून लोकसभेच्या खासदार आहेत. कनिमोळी या उपसरचिटणीस आणि महिला विभागाच्या सचिव आहेत, तर स्टॅलिन हे 28 ऑगस्ट 2018 पासून डिएमके पक्षाचे अध्यक्ष आहेत.

Bhaubij 2022 Special
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा

सिंधिया भावंड :

ग्वाल्हेरच्या शेवटचे शासक राजाच्या पोटी जन्मलेल्या माधवराव सिंधिया, यशोधरा सिंधिया आणि वसुंधरा राजे यांनी त्यांच्या आईचे त्यांच्या कौटुंबिक अनुसरण केले. विजया राजे सिंधिया भारतातील एक प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आहेत. राजकारणात प्रवेश केला, परंतु राजकीय भिन्न मार्ग निवडले. माधवराव सिंधिया हे काँग्रेसचे निष्ठावंत असताना, त्यांच्या बहिणी यशोधरा आणि वसुंधरा राजे यांनी मात्र भारतीय जनता पक्षाचा निवड केली.

माधवराव सिंधियांचे पुत्र ज्योतिरादित्य 2020 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले. माधवराव सिंधिया यांचे 2001 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाले. यशोधरा राजे सिंधिया या मध्य प्रदेशच्या क्रीडा आणि युवक कल्याण, तंत्रशिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री आहेत. तर वसुंधरा राजे यांनी 2003 ते 2008 आणि 2013 ते 2018 या दोन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून काम केले.

माधवराव सिंधिया यांनी 1996 मध्ये मध्य प्रदेश विकास काँग्रेसची स्थापना केली, त्यांना लोकसभेसाठी काँग्रेसचे तिकीट नाकारण्यात आले होते. केंद्रात असलेल्या काँग्रेसप्रणित सरकारमध्ये प्रदेश विकास काँग्रेस सामील झाली. 1998 मध्ये मात्र हा पक्ष पुन्हा काँग्रेसमध्ये विलीन झाला.

तेज प्रताप यादव, तेजस्वी यादव आणि मीसा भारती :

राजकारणात सामील झालेल्या भावंडांपैकी बिहारमधील आणखी आणखी एक नाव म्हणजे राष्ट्रीय जनता दलचे संस्थापक आणि अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी यांची मुले. तेजस्वी यादव हे बिहारचे विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांचा क्रिकेटमध्येही अल्पकाळ कार्यकाळ राहिला आहे. 2008 मध्ये, तेजस्वी यांना त्या वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझीसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्सने करारबद्ध केले होते.

तेज प्रताप हे बिहार सरकारमधील पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे कॅबिनेट मंत्री आहेत. ते 2015 ते 2020 पर्यंत राष्ट्रीय जनता दल (RJD) चे सदस्य म्हणून महुआ मतदारसंघातून बिहार विधानसभेचे आमदार होते. मीसा भारती राज्यसभेच्या खासदार आहेत. 2014 मध्ये, भारती यांनी पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि भाजपमध्ये सामील झालेल्या आरजेडी बंडखोर राम कृपाल यादव यांच्याकडून पराभव झाला. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे पाटलीपुत्र मतदारसंघातून पुन्हा पराभव झाला.

अजित पवार आणि सुप्रिया सुळे :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) दोन्ही महत्त्वाचे नेते पहिल्यांदा भाऊ बहिण आहेत आणि नंतर ते राजकारणी आहेत, असे त्यांनीच अनेकवेळा बोलून दाखवले आहे. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसेवा शरद पवार यांच्या कन्या आहेत, तर अजित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र आहेत.

जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला :

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी आणि शर्मिला :

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी हे येदुगुरी सौंधिती शर्मिला रेड्डी यांचे मोठे बंधू आहेत. वायएस राजशेखर रेड्डी आणि वायएस विजयम्मा यांच्या पोटी जन्मलेल्या जगन आणि शर्मिला यांनी राजकारणाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले आहेत. रेड्डी हे येदुगुरी सौंधिती शर्मिला रेड्डी यांचे मोठे बंधू आहेत. वायएस राजशेखर रेड्डी आणि वायएस विजयम्मा यांच्या पोटी जन्मलेल्या जगन आणि शर्मिला यांनी राजकारणाला आपले कार्यक्षेत्र म्हणून निवडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com