शिवसेनेची मुलूख मैदानी तोफ महाराष्ट्रभर धडाडणार...

Bhaskar Jadhav : मर्दाची अवलाद असाल तर आमदारकीचा राजीनामा द्या...
Bhaskar Jadhav Latest News
Bhaskar Jadhav Latest News Sarkarnama

चिपळूण : महाराष्ट्रात शिवसेनेला संपवण्यासाठी भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न करून पाहिले. मुंबई पालिका निवडणूक जिंकण्यासाठी भाजप राज्यात दंगली घडवण्याची शक्यता आहे. हे शेवटचे अस्त्र भाजप वापरण्याची भीती आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी गुहागरच्या मेळाव्यात व्यक्त केली.

दरम्यान, गणेशोत्सवानंतर मी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंना भेटणार असून छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र दौऱ्याचे सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. यामुळे जाधव यांच्या सभेचा झंजावात आता राज्याला बघायला मिळणार आहे. (Bhaskar Jadhav Latest News)

Bhaskar Jadhav Latest News
भाजपकडून लोकसभा निवडणुक राज्य प्रभारींची घोषणा; पंकजा मुंडे, तावडेंना मिळाली जबाबदारी

आमदार जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल गुहागर तालुक्याच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या मार्गदर्शन करताना जाधव म्हणाले की, देशात ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आली त्या त्या राज्यात भाजपने दंगली घडवल्या हा इतिहास आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे सर्व जातीधर्माच्या लोकांमध्ये लोकप्रिय होत आहेत त्यामुळेच भाजप दंगली घडवण्याचा धोका आहे, असा आरोपही जाधव यांनी केला.

बंडखोर आमदारांना आव्हान देताना ते म्हणाले की, तुम्ही मर्दाची अवलाद असाल तर आमदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही सच्चा आहात की बदमाश हे जनतेला ठरवू द्या. तुमच्यात धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. तुम्ही कोण आहात ते जनता ठरवेल. या सरकारने आमचे सरकार आले आणि सण सुरू झाले असे बोर्ड लावले आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोरोना काळात केलेल्या यशस्वी कामगिरीमुळेच आपले सण आज चांगल्या प्रकारे साजरे होत आहेत. उलट कोरोना काळात मुंबईकरांना गावाकडे येऊ नये अशीच भूमिका येथील भाजप नेत्यांनी घेतली होती, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Bhaskar Jadhav Latest News
संजय राऊतांचे बंधू सुनील राऊतांना अचानक 'मातोश्री' वरुन बोलावणं...

पुढे बोलतांना जाधव म्हणाले की, शिवसेना व ठाकरे हे अतूट नाते आहे. ते कोणीही तोडू शकत नाही. भाजपला तुम्ही फक्त सत्ते पुरते पाहिजेत. सर्वधर्मसमभावाचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली म्हणूनच आज मुस्लिम समाज आमच्या सोबत येत आहे व हेच वातावरण भाजपला अस्वस्थ करत होत कधी कंगना राणावत कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्न केला. इतर पक्षातील लोकांवर भ्रष्टाचारचे आरोप ईडी चौकशीनंतर अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला यानंतर ते धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले भाजपमधील अनेक पदाधिकारी नाराज आहेत काम करूनही मागे बसावे लागत आहे. व इतर पक्षातील पुढे जात आहेत, अशी त्यांच्यामध्ये नाराजीची भावना निर्माण होत आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपचा समाचार घेतला.

दरम्यान गणेशोत्सवानंतर मी पक्ष प्रमुख उध्दव ठाकरेंना भेटणार आहे. माझ्याकडून त्यांना काय अपेक्षा आहेत त्या जाणून घेवून छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन रायगड जिल्ह्यातून महाराष्ट्र दौऱ्याचे सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. यावेळी रवींद्र सुर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव महेश्वर नाटेकर विनायक मुळे सचिन बाईत जयदेव मोरे विलास गुरव संजय पवार आधी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com