भास्कर जाधव दशावतारातील सोंगाड्या; त्याने तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा अपमान केलाय....

माझे तर म्हणणे आहे की, ते रडले का नाहीत, त्यांनी स्वतःचे कपडे का फाडून घेतले नाहीत. मुळात सत्ताधाऱ्यांनी अशा सोंगाड्यावर माणसावर विश्वास ठेऊ नये.
भास्कर जाधव दशावतारातील सोंगाड्या; त्याने तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा अपमान केलाय....
Bhaskar Jadhav Songadya in Dashavatara; He insulted the chair of the assembly president ....

मुंबई : कोकणात दशावतारात नरकासूर असतो, तो वेगवेगळे सोंग बदलतो. त्यापध्दतीने भास्कर जाधव सोंगाड्या असून त्याला कोणीही शिव्या दिलेल्या नाहीत. तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा अपमान या सोंगाड्या माणसाने केलेला आहे. उलट आमचे १२ आमदार ओबीसींच्या प्रश्नासाठी सैनिकांप्रमाणे लढले आहेत, अशी सडेतोड टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. Bhaskar Jadhav Songadya in Dashavatara; He insulted the chair of the assembly president ....

ओबीसी आरक्षणावरून सभागृहात झालेल्या गदारोळावरून सत्ताधाऱ्यांनी भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन केले आहे. यावरून आमदार नितेश राणे संतप्त झाले असून त्यांनी विधानसभा तालिका अध्यक्ष भास्करराव जाधव यांच्यावर सडकून टीका केली. ते म्हणाले, आम्ही कोकणातील असून भास्कर जाधवही कोकणातील आहेत. कोकणात दशावतार नाटक असते.

त्यामध्ये नरकासूर असतो, तो वेगवेगळी सोंग बदलतो. ज्या प्रमाणे तमाशात सोंगाड्या असतो. त्याप्रमोण जे जे भास्कर जाधव यांना ओळखतात त्यांना माहिती आहे. तो सोंगाड्या आहे. तो नरकासूरासारखी सोंग बदलतो. काल सभागृहात त्याला कोणीही शिवी दिलेली नाही. त्यामुळे सोंग करताना तो कुठला विषय करतो हे आम्ही ओळखून आहे. तालिका अध्यक्षांच्या खूर्चीचा  या सोंगाड्या माणसाने अपमान केला आहे.

माझे तर म्हणणे आहे की, ते रडले का नाहीत, त्यांनी स्वतःचे कपडे का फाडून घेतले नाहीत. मुळात सत्ताधाऱ्यांनी अशा सोंगाड्यावर माणसावर विश्वास न ठेवता ते १२ आमदार सैनिकांसारखे ओबीसींसाठी लढले. स्वतःला त्यांनी निलंबित करून घेतले नाही. ओबीसी समाजावर अन्याय होत असताना ते लढले.

मुळात मुख्यमंत्री सुद्धा सोंगाड्या आहे. हे नरकासूर व सोंगाड्याचे सरकार आहे, त्यांच्याकडून काहीही अपेक्षा ठेऊ नयेत. हे असेच वागणार १२ आमदार निलंबित नाही तर ते जनतेच्या विषयी लढलेत. सध्या याचे कोकणात पडसाद उमटत आहेत, यावर नितेश राणे म्हणाले, आम्ही भास्कर जाधवला ओळखतो, तो सोंगाड्या आणि नरकासूर आहेत. हे नवे काहीही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Related Stories

No stories found.