Bhaskar Jadhav News : शिंदे गटात येण्यासाठी भास्कर जाधव अनेकदा फोन करायचे : मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयाचा खळबळजनक दावा

तुम्ही नारायण राणे आणि उदय सामंत यांचे काय ते बघा, शिंदे गटात येतो.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama

ठाणे : ठाणे शहरात येऊन आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर टीका करतात, पण, ठाकरे गटात काहीच उरले नाही, तुम्ही नारायण राणे आणि उदय सामंत यांचे काय ते बघा, शिंदे गटात येतो, असे अनेक वेळा फोन भास्कर जाधव यांनी केल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केला आहे. (Bhaskar Jadhav often called to join the Shinde group : Naresh Mhaske)

भास्कर जाधव सध्या ‘मातोश्री’मध्ये आपण किती विश्वासू आहोत, हे दाखवण्यासाठी खटाटोप करत आहेत. पण, ते जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते, तेव्हा त्यांनी ठाकरे कुटुंबीयांना शिव्यांची लाखोली वाहिली, हे सर्वांना माहीत असल्याचेही म्हस्के यांनी सांगितले.

Bhaskar Jadhav
Raut-shirsat Meeting : खासदार संजय राऊत-आमदार संजय शिरसाट यांची भेट : शिरसाट म्हणतात...

खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) बाईक रॅली आणि गडकरी रंगायतन येथील शिवगर्जना मेळाव्यालाही ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठाण्यातील मेळाव्यात भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचा खरपूस शब्दांत समाचार घेतला. त्याला प्रतिउत्तर देण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते माजी महापौर नरेश म्हस्के यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी भास्कर जाधवांवर गंभीर आरोप केला.

Bhaskar Jadhav
Latur News : फडणवीसांच्या आशीर्वादाने पवार-चौगुलेंनी ‘किल्लारी’चे शिवधनुष्य पेलले; पण...

आदित्य ठाकरे यांच्या नावाचे ब्रँडिंग करण्यासाठी आणि त्यांच्या संवाद यात्रा, परदेशी दौरे करण्यासाठी कुठून पैसा आला, असा थेट सवाल नरेश म्हस्के यांनी केला. तसेच ‘मातोश्री’मधील चंदू-नंदू कोण आणि कोण पैसे मोजतो, यासंदर्भात तोंड उघडायला लावू नका. नाही तर रस्त्यावरून फिरणे मुश्कील होईल, असा इशाराही म्हस्के यांनी दिला आहे. आता आदित्य ठाकरे यांच्याकडे ठाकरे या आडनावाशिवाय दुसरे काहीच नाही. त्याचेच भावनिक भांडवल ते करणार असल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com