Bhaskar Jadhav : कोण तुमचं स्वागत करायला मातोश्रीवर बसलंय... भास्कर जाधवांचा शिंदे गटाला प्रश्न

मुंबई महापालिका Mumbai Mahapalika निवडणूक आणि जुनी आणि नवीन मातोश्री Matoshri यावरून भास्कर जाधव Bhaskar Jadhav यांनी शिंदे गटातील Shinde Group आमदारांवर टीकास्त्र सोडले.
Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhavsarkarnama

मुंबई : कोण बोलवायला आलंय, कुणी तुम्हाला थारा दिलाय, कोण तुमचे स्वागत करायला आलंय, त्याची काय गरज आहे, असा प्रश्न करून जुन्या मातोश्रीशी निष्ठावंत असल्याचे नव्यांना दाखवून देण्याचा हा शिंदे गटातील आमदारांचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी केली आहे.

मुंबई महापालिका निवडणूक आणि जुनी आणि नवीन मातोश्री यावरून श्री. जाधव यांनी शिंदे गटातील आमदारांवर टीकास्त्र सोडले. मुंबई महापालिकेत पुन्हा शिवसेनेचीच सत्ता येईल, असे ठामपणे सांगत ते म्हणाले, भाजपच्या लोकांना वाटत होते, मुंबई महापालिका आमच्या ताब्यात सहज येईल. परंतू शिवसेनेने अनेक वर्षात अनेक जाती धर्माच्या लोकांना आपलं समजून मदत केली आहे.

Bhaskar Jadhav
विधान भवनाच्या पायऱ्यांवर शिंदे गट आणि विरोधक आमदारांमध्ये धक्काबुक्की; पहा व्हिडीओ

तसेच त्यांच्या अडीअडचणीत धावून गेली आहे. कोरोनाच्या काळात शिवसैनिकांनी साठेबाजांची गोदामे फोडून आपल्या अंगावर केसेस घेऊन लोकांना मदत केली. ॲम्ब्युलन्सची सेवा सर्वप्रथम शिवसेनेने सुरू केली होती. त्या काळात कुठेही अपघात झाला आणि जखमींना रक्ताची गरज लागली तर त्यावेळी शिवसेनेतील शाखेतील कार्यकर्ता येऊन रक्तदान करत होता. त्यावेळी शिवसैनिकांनी जात, धर्म पाहिला नाही.

Bhaskar Jadhav
Thackeray vs Shinde : आठ प्रश्नांच्या आधारे घटनापीठ ठरविणार खरी शिवसेना कुणाची?

याची जाणीव मुंबईतील अनेक लोकांना आहे. ही सगळी लोक शिवसेनेच्या मागे उभी राहणार आहेत. पुन्हा एकदा शिवसेनेच्या ताब्यातच मुंबई महापालिकेची सत्ता देणार आहे. याची जाणीव भाजपला झाल्याने त्यांनी शिवसेनेचे मतदार कमी करण्याचा उद्योग चालवला आहे. त्यातही त्यांना यश मिळणार नाही.

Bhaskar Jadhav
Bhaskar Jadhav : भास्कर जाधव संतापले; म्हणाले, आमदार राणेंना काही शिकवा हो...

आदित्य ठकारे यांच्या निष्टा यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय, हे पाहून भाजपच्या लोकांच्या पायाखालची वाळू निसटली आहे. आदित्य ठाकरेंना एवढा प्रतिसाद मिळतोय. मग, उद्धव ठाकरे साहेब बाहेर पडतील, त्यावेळी काय होईल. याची जाणीव भाजपला झाली आहे. त्यातून शेवटचे शस्त्र म्हणून त्यांनी सरकारच्या अधिकाराचा दुरूपयोग करून मुंबई महापालिकेची चौकशी लावली आहे.

Bhaskar Jadhav
Maharashtra Assembly : युवराजांची दिशा चुकली ; "आदित्य ठाकरे गाढवावर.." शिंदे गटाची बॅनरबाजी

पण, मुंबईतील सर्व जनता शिवसेनेलाच महापालिकेत सत्ता मिळवून देईल, असा विश्वास श्री. जाधव यांनी व्यक्त केला आहे. बॅनर, पोस्टरवरून सत्ताधाऱ्यांनी ठाकरे कुटुंबावर टीका केली आहे, याविषयी भाष्य करताना भास्कर जाधव म्हणाले, विरोधी गटाचा माणूस नेहमी शक्तीस्थळावर आघात करतात.

Bhaskar Jadhav
शिवसेनेवर कुरघोडी; मुंबई महापालिका प्रभाग रचनेची `एसीबी`मार्फत चौकशी

आदित्य ठाकरे साहेबांना प्रतिसाद मिळतोय हे पाहून त्यांच्या लक्षात आलंय की आदित्य ठाकरे हे शिवसेनेचे शक्तीस्थळ तयार होत आहे. म्हणून विरोधकांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. जुनी मातोश्रीवर आमची श्रद्धा आहे, पण आता नवी नवीन तयार झाली आहे, असे सत्ताधारी सांगत आहेत. याविषयी श्री. जाधव यांना छेडले असता ते म्हणाले, कोण बोलवायला आलंय, कुणी तुम्हाला थारा दिलाय.

Bhaskar Jadhav
पुरूषोत्तम जाधव झाले शिंदे गट शिवसेनेचे सातारा जिल्हा प्रमुख...

कोण तुमचे स्वागत करायला आलंय, गरज काय आहे. आम्ही जुन्या मातोश्रीशी निष्ठावंत आहोत, हे नव्यांना दाखवून देण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका त्यांनी केली. सर्वसामान्य लोकही आता शिंदे गटाच्या आमदारांना ५० खोकी म्हणायला लागले आहेत. आता त्यांना कोणीही विसरणार नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in