Bhaskar Jadhav : सीमावाद प्रश्नी भास्कर जाधवांनी देसाईंना डिवचलं : म्हणाले, शंभू देसाईंचा...

Bhaskar Jadhav : यावर शंभुराज देसाई यांनीही पलटवार केला आहे.
Bhaskar Jadhav  | Shambhuraj Desai
Bhaskar Jadhav | Shambhuraj Desai Sarkarnama

Bhaskar Jadhav : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद आणि यावर राजकीय टिका टिप्पणी थांबताना दिसत नाही. शिवसेना ठाकरे गटाचे नते भास्कर जाधव यांनी राज्याचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर टीका केली आहे. "मंत्री शंभूराज देसाई हे कर्नाटकला जाणार होते. मात्र, आता त्यांचाच चंबू झाला आहे, असं खोचकार भास्कर जाधव यांनी केला. तर यावर प्रत्युत्तर देताना देसाई म्हणाले की, भास्कर जाधव यांना आपण फार महत्त्व देत नाही, असं शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी म्हंटलं

भास्कर जाधव म्हणाले, राज्यातल्या मंत्र्यांच्या तोंडाला आता लॉक लागलं आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई रोज काही ना काही महाराष्ट्रावर शाब्दिक हल्ला करतायेत. सीमावर्ती भागातील मराठी लोकांवर कर्नाटकाडून रोज अन्याय सुरू आहे. मात्र, यासंदर्भात महाराष्ट्रातलं सरकार आणि त्यांचे मंत्री तोंडच उघडत नाही. त्यांच्या तोंडाला लॉक लागले आहे.

Bhaskar Jadhav  | Shambhuraj Desai
Pune : माधुरी मिसाळ यांची लक्षवेधी अन् फडणवीसांची मोठी घोषणा; झोपडपट्टी विकासाला मिळणार...

शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी राणाभीमदेवीच्या थाटात सांगितलं की, आम्ही सीमावादाप्रश्नी कर्नाटकला जाणार आहोत. मात्र कर्नाटकच्याच मुख्यमंत्र्यांनी दम भरला. चंद्रकांत पाटीलांसारख्या सरकारमधील एक मजबूत मंत्री आणि एक चंबू देसाई यांच्या तोंडाचा चंबू झाला, असा खोचक टोला जाधव यांनी लगावला.

यावर प्रत्युत्तर देताना देसाई म्हणाले, यांच्याकडे सभागृहात बोलण्यासारखं काहीच नाही. म्हणून बाहेर जाऊन बोलत आहेत. सरकारची बाजू जोरकसपणे मांडणाऱ्या मंत्र्यांवर मात्र टीका करायची. मात्र, आमची तशी संस्कृती नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून आम्हाला काही सूचना आहेत, की कोणत्या पद्धतीने कामे करायची. टीका करणारे मात्र बोलत राहतील.

Bhaskar Jadhav  | Shambhuraj Desai
Jorgewar : आमदार जोरगेवारांच्या मागणीची मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल, दिला ‘हा’ शब्द !

पुढच्या २०२४ निवडणुकांमध्ये आपलं काय होणार याची काळजी भास्कर जाधवांनी करावी, असाही सल्ला शंभूराज देसाई यांनी दिला. माझी त्यांनी करू नये, असेही देसाई म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com