सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतिर्थ'वर

यापूर्वी शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देखील भेट दिली होती.
सचिन तेंडुलकर राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'शिवतिर्थ'वर
Sachin Tendulkar & Raj ThackeraySarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी नुकतेच आपल्या नव्या 'शिवतिर्थ' (Shivtirth) घरात वास्तव्यास गेले आहे. यामुळे अनेक मान्यवर त्यांच्या घरी जात त्यांची सदिच्छा भेट घेत आहेत. दरम्यान, भारताचे माजी महान क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी (ता.22 नोव्हेंबर) ठाकरे यांच्या घरी जात सदिच्छा भेट घेतली आहे. हे दोघेही घरातील गॅलरीमध्ये उभे असताना अनेकांनी त्यांच्या घराबाहेर गर्दी केली व त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले आहे.

Sachin Tendulkar & Raj Thackeray
फडणवीसांच्या काळात मराठा समाजाची कामे झाली; ठाकरे सरकार मात्र...

राज ठाकरे यांचे आधीचे निवासस्थान अललेल्या 'कृष्णकुंज'च्या शेजारीच 'शिवतिर्थ' हे नवीन निवासस्थान बांधण्यात आले आहे. ठाकरे यांनी या नव्या घरात ६ नोव्हेंबर रोजी दिवाळी व भाऊबीज सणाच्या शुभमुहुर्तावर गृहप्रवेश केला होता. या नव्या घराला यापूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील भेट दिली होती. व अन्य मान्यवर त्यांच्या घराला भेटी देत आहेत. ठाकरे यांचे हे नवीन घर पाच मजली असून सर्व सोयीसुविधायूक्त असणार आहे. 'शिवतीर्थ' असे या नव्या घराला नाव ठेवण्यात आले आहे.

Sachin Tendulkar & Raj Thackeray
चांदीवाल समितीसमोर सचिन वाझे म्हणाला, मी तर फक्त एक छोटे प्यादे...

अशी आहे घराची रचना..

या पाच मजली इमारतीत पहिल्या मजल्यावर समिती कक्षाची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, याच इमारतीतमध्ये आता मनसेचे मुख्य कार्यालय देखील असणार आहे. याच ठिकाणी ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांना भेटणार आहेत, याबरोबरच नागरिकांना सुद्धा याच कार्यालयात त्यांची भेट घेता येणार आहे, असे सांगण्यात येत आहे. इतर मजल्यावर ठाकरे यांच्या कुटुंबीयांच्या निवासाची सोय करण्यात आली असून या इमारतीमध्येच सर्व सोयीसुविधायुक्त असे भव्य ग्रंथालय देखील उभारण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in