'भारत जोडो यात्रा' नफरतीच्या माहोल दुरूस्तीसाठी : सामनातून भाजपवर टीकास्त्र

Shivsena : ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे.
Uddhav Thackeray|
Uddhav Thackeray|Sarkarnama

मुंबई : आज सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेस पक्षाची राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेली भारत जोडो यात्रा कशासाठी आहे, याचे काही मुद्दे सांगण्यात आले आहे. राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ , ऐक्याचा माहोल निर्माण व्हावी, यासाठीची ही यात्रा असल्याचं सामनामधून म्हंटले आहे. देशात मोठया प्रमाणात बेरोजगारी वाढत असून शेतकरी, मजूर आणि छोटे-मध्यम उद्योग अडचणीत आल्याची टीका राहुल गांधी करतात व भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) अशा भूमिका घेऊन पुढे सरकत आहे . राहुल गांधींची भारत जोडो पदयात्रा नफरती माहोल दुरुस्त करून हिंदुस्थानात स्वच्छ, ऐक्याचा माहोल निर्माण व्हावा यासाठीच आहे . त्यांनी पाच हजाराचे टी शर्ट घातले काय किंवा ते उघडे फिरले काय, फरक पडत नाही. राहुलवरील टीका भाजपास मात्र उघडे पाडीत आहे . कर्तव्यपथा वरील पोटदुखीने काय साध्य होणार!”, असं सामनातून (Saamana Editorial) भाजपवर थेट वार करण्यात आलं आहे.

राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते कश्मीर अशा ‘भारत जोडो’ यात्रेने भाजपची पोटदुखी वाढू लागली आहे. डोकेदुखी नैसर्गिक आहे. राजकीय पोटदुखी ही एक प्रकारच्या विकृत मानसिकतेतून जन्मास येते. पोटात व डोक्यात वळवळणारे किडे तोंडातून म्हणजे शब्दांतून बाहेर पडतात. भाजप प्रवक्त्यांनी असे किडे तोंडावाटे सोडायला सुरुवात केली आहे, असा घणाघात सामनातून भाजपवर करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray|
Sada sarvankar | हवेत गोळीबार करणं भोवलं; सरवणकर पितापुत्रांना पोलिसांकडून समन्स

राहुल गांधी हे भारत जोडो पदयात्रेत जे टी शर्ट वापरत आहेत त्याची किंमत 41 हजार रुपये असल्याची माहिती भाजप प्रवक्त्यांनी जाहीर केली. या अशा वक्तव्यांनी काय साध्य होणार? राहुल गांधी व त्यांचा काँग्रेस पक्ष त्यांचे काम करीत आहे. ‘भारत जोडो’ ही एक चांगली संकल्पना आहे, असं म्हणत काँग्रेसच्या राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्त्वातील भारत जोडो’ यात्रेला सामनातून पाठबळ देण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in