Bharat Jodo Yatra : यात्रा महाराष्ट्रात पोहचणार : काँग्रेस नेत्यांचा व्यायाम सराव सुरू!

Bharat Jodo Yatra : राहुल गांधींसोबत महाराष्ट्रात ३८२ किमीचा यात्रेचा प्रवास असणार आहे.
Ashok Chavhan & Nana Patole
Ashok Chavhan & Nana Patole Sarkarnama

मुंबई : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’आता तेलंगणातून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत सहभागी होत आहेत. भारत जोडो यात्रा तेलंगणा राज्यातून 7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील देगलूर या ठिकाणी येथे पोहोचणार माहिती आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले की, राहुल गांधींसोबत यात्रेत सहभागी होता यावे, यासाठी इतर नेत्यांसोबत वेगाने चालण्याचा सराव सुरू केला आहे. येथील लोक यात्रेत सहभागी होण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. आम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही व्यायाम करतो. चालणे आरोग्यासाठी चांगले आहे.' असेही चव्हाण म्हणाले.

Ashok Chavhan & Nana Patole
Gujrat Politics| गुजरात निवडणुकीपुर्वी शहांचा डाव, केली मोठी घोषणा

नाना पटोलेंनी केला व्यायाम :

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मी वॉर्मअप आणि व्यायाम करत आहे. यासोबतच प्रवास करताना तंदुरुस्त राहण्यासाठी पुश-अपचा देखील सराव करत आहे. पटोले म्हणाले की, राहुल गांधींसोबत राज्यात ३८२ किमीचा प्रवास करणे हे पक्षप्रमुख म्हणून माझे कर्तव्य आहे. त्याचवेळी काँग्रेसचे आमदार डीपी सावंत म्हणाले की, मी राहुल गांधी यांच्यासोबत जमेल तेवढे चालेन. आम्ही दररोज ५ किमीचा मॉर्निंग वॉक करतो.

Ashok Chavhan & Nana Patole
Bharat Jodo Yatra : राहुल गांधी चढले बसच्या टपावर, व्हिडीओ तूफान व्हायरल!

भारत जोडो यात्रा ७ नोव्हेंबरला महाराष्ट्रात पोहोचणार :

भारत जोडो यात्रा शुक्रवारी विश्रांती घेणार असून, शनिवारी तेलंगणातील मेडक येथून सुरू होणार आहे. ही यात्रा तेलंगणातील 19 विधानसभा आणि 7 लोकसभा मतदारसंघातून जाईल. ही यात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी 375 किमी अंतर कापेल. या दरम्यान क्रीडा, व्यवसाय आणि मनोरंजन क्षेत्रातील लोकांना राहुल गांधींनी भेट घेतली.

तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून ७ सप्टेंबर रोजी 'भारत जोडो यात्रा' सुरू झाली होती. मागील आठवड्यात तेलंगणात यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी राहुल गांधींनी केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकचा दौरा केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in