Bharat Jodo Yatra : राहुल गांधींच्या यात्रेला 250 लेखक-साहित्यिकांचा जाहीर पाठींबा!

Bharat Jodo Yatra : बाबा आमटे यांच्या भारत जोडो यात्रेशी तुलना करत राहुल गांधींचं कौतुकही करण्यात आलंय.
Bharat Jodo Yatra
Bharat Jodo YatraSarkarnama

मुंबई : महाराष्ट्रामध्ये दाखल झालेल्या राहुल गांधींच्या नेतृत्वातली भारत जोडो यात्रेला जनमानसातून मोठा पाठिंबा मिळत असताना आता या यात्रेला लेखक, माजी संमेलन अध्यक्ष, माजी सनदी अधिकाऱ्यांनी पाठींबा दिला आहे. तब्बल अडिचशेहून साहित्यकांनी भारत जोडो यात्रेला पाठिंबा दर्शवला आहे. पाठींबा दर्शवणारं एक पत्रही साहित्यकांनी राहुल गांधींना दिलंय. यामुळे भारत जोडो यात्रेला पाठींबा वाढत आहे.

देशातील सद्यस्थितीतल्या काही मुद्द्यावर साहित्यकांकडून चिंता व्यक्त करण्यात आली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधीच्या भारत जोडोची तुलना समाजसेवक बाबा आमटे यांच्या भारत जोडो यात्रेशी तुलना करत त्यांचं कौतुकही करण्यात आलंय.

Bharat Jodo Yatra
Bharat Jodo Yatra : शेतकर्‍यांनी विम्यासाठी भरलेला पैसा जातो कुठे?, राहुल गांधींचा सवाल!

राहुल गांधींना देण्यात आलेल्या पाठींब्याच्या पत्रात म्हंटले आहे की, स्वातंत्र्योत्तर काळाने समता, आर्थिक स्वातंत्र्य, शिक्षण, विज्ञान - तंत्रज्ञान, समतोल लोकशाहीचे स्वप्न पाहिले होते. तत्कालीन जगातील नवजात लोकशाही तुलनेत चांगले यश आले हे नाकारता येत नाही. मात्र भारतीय संविधानाला एकनिष्ठ राहून जे काही मिळवणे अपेक्षित आहे, ते मिळवण्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता वाढल्याचे दिसून येत आहे. आपली बहुविविधता नाकारून, एका एकेरी तथाकथित संस्कृतीची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सगळ्या गोष्टी सामाजिक विघटकरणाला आमंत्रित करत आहेत.

कलावंतासाठी सर्वात मोठा अपमान कोणता असेल तर तो म्हणजे स्वत:च्या नजरेतून उतरणे. एकूण भारतीय जनवादी परंपरा समजून घेऊन वर्तमानाच्या पार्श्वभूमीवर आम्ही याबाबत आवाहन करत आहोत. भारत जोडो एका राजकीय पक्षाचं आंदोलन राहिलं नसून, जनतेच्या प्रतिसादामुळे ते आता एक लोक चळवळ होऊ पाहते आहे. बाबा आमटेंच्या 1986 सालच्या भारत जोडो उपक्रमाच्या स्मृती या निमित्ताने जागा झाल्या. खऱ्या देशभक्तीचं संवेदन नेमके काय असते हे या निमित्ताने पाहायला मिळाले.

Bharat Jodo Yatra
खानाच्या कबरीजवळील 'त्या' तीन कबरी कोणाच्या? इतिहास संशोधकांनी दिले उत्तर...

विद्यमान भारत जोडो आंदोलनामुळे जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे या अस्वस्थतेला एक स्वत:चा आवाज मिळत चालला आहे. भारत जोडो साहित्य दिंडी हे शीर्षक आम्ही हेतूपूर्वक निवडले आहे. ज्याचा संबंध महाराष्ट्री सहिष्णू परंपरेशी आणि मराठी मातीशी आहे. हा उपक्रम कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com