Bharat Jodo Yatra : राहुल गांधींची महाराष्ट्रात एन्ट्री होताच वाजणार ‘हे’ गाणं

Bharat Jodo Yatra : गाण्याच्या सुरुवातीला रायगडासह अनेक किल्ल्यांचे व्हिज्यूअल्स दाखवण्यात आले आहेत.
Bharat Jodo Yatra latest news
Bharat Jodo Yatra latest newssarkarnama

Bharat Jodo Yatra : केरळ, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा अशा चार राज्यांनंतर आता काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ येत्या 7 नोव्हेंबरला देगलूरमध्ये (महाराष्ट्रात) दाखल होणार आहे. या यात्रेचे स्वागत करण्यासाठी काँग्रेसची जोरदार तयारी सुरु आहे. (Bharat Jodo Yatra latest news)

कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे महाराष्ट्र स्वागत करण्यासाठी युवक काँग्रेसने एक गाणं रिलीज केले आहे. हे गाणं सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्र काँग्रेसने रिलीज केलेलं हे गाणं युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय हँडलवरून शेअर करण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील हजारो कॉंग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरून उतरून राहुल गांधींच्या यात्रेला समर्थन देण्याची शक्यता आहे.

Bharat Jodo Yatra latest news
MNS : राज ठाकरेंनी केली पदाधिकाऱ्यांची कान उघाडणी ; दिला 'हा' आदेश

"कन्याकुमारी ते काश्मिरपर्यंत भारत जोडूया, मराठी मातीचा अभिमान असू द्या, भारत जोडू या," अशा आशयाचं हे नवं गाणं रिलीज केलं आहे. ‘भारत जोडू’ या मराठी गाण्याच्या सुरुवातीला रायगडासह अनेक किल्ल्यांचे व्हिज्यूअल्स दाखवण्यात आले आहेत. यासोबत राहुल गांधींच्या पदयात्रेतील गर्दी, त्या गर्दीतील कार्यकर्त्यांचा उत्साह दाखवण्यात आला आहे.

काल (रविवारी) गोलापल्ली (तेलंगणा) येथील यात्रेच्या ५ व्या दिवशी राहुल गांधींच्या यात्रेत काही शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. राहुल गांधी विद्यार्थ्यांना पळण्याची शर्यत लावणार का ? असे विचारले. विद्यार्थ्यांनी होकार देताच ते विद्यार्थ्यांसोबत काही अंतर धावत गेले,असे या व्हिडिओमध्ये दिसते. तेलंगणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डी व इतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या मागे धावताना दिसत आहेत. तेलंगणातून नांदेड जिल्ह्यातील देगलुर येथून यात्रेचा महाराष्ट्रात प्रवेश होईल. राहुल गांधी यांची पहिली जाहीर सभा नांदेड येथे होणार आहे.

यात्रेचे महाराष्ट्रातील वेळापत्रक

  1. यात्रा सर्वप्रथम नांदेड जिल्ह्यातील देगलूर, नायगाव, लोहा, कंधार, भोकर आणि हदगांव तालुक्यातून हिंगोलीमध्ये प्रवेश करेल,

  2. कळमनुरी, हिंगोलीमार्गे ही यात्रा वाशिम जिल्ह्यातील रिसोडमध्ये पोहचेल.

  3. अकोल्यातील बाळापूरमार्गे बुलढाण्यातील खामगावंसह जामोद आणि जळगांवमार्गे ही यात्रा मध्यप्रदेशात प्रवेश करेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in