Bharat Joodo Yatra : महाराष्ट्रातील 'हे' नऊजण यात्रेत सहभागी का झाले माहितेय?

Bharat Joodo Yatra : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या नांदेड मध्ये सुरु आहे.
Bharat Jodo Yatra Latest News
Bharat Jodo Yatra Latest NewsSarkarnama

Bharat Joodo Yatra : राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखाली निघालेली भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात पोहोचली आहे. दरम्यान, राहुल गांधींच्या नेतृत्वातील या यात्रेत महाराष्ट्रातील नऊ जण सहभागी झाले आहेत.

कन्याकुमारी ते काश्मीर पदयात्रेत ते यात्रेत असणार आहेत. त्यातील सर्वांनीच थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं असून आपण यात्रेत का चालतोय? वा का सहभाग का? घेतला याबाबत थोडक्यात प्रतिक्रिया दिल्या आहेत. (Bharat Jodo Yatra, Nanded Latest News)

Bharat Jodo Yatra Latest News
Bharat Jodo : नरसी फाट्यावर पोहचताच दिवंगत राजीव गांधींच्या शेवटच्या सभेची आठवण..

डॉ. श्रावण रॅपनवाड (नांदेड) : बेरोजगारी, जातीयवाद वाढला आहे, तो कमी व्हावा आणि संविधान वाचवण्यासाठी मी यात्रेत चालत आहे.

नंदा म्हात्रे (रायगड) : लोकांचे ऐकूनच स्वातंत्र्याची लढाई लढली. राहुल गांधीही आता लोकांचे ऐकत आहेत. लोकांच्या आनंदासाठी ही यात्रा आहे.

महेंद्रसिंह वोहरा (नागपूर) : महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारीने कळस गाठला आहे. भावा-भावात भांडणे लावताहेत, म्हणून सरकारविरोधात यात्रेत आलो.

Bharat Jodo Yatra Latest News
Bharat Jodo : हजारोंच्या गर्दीतही राहूल गांधींचे लक्ष `त्या` चिमुकलीकडे गेलेच..

वैष्णवी भारद्वाज (नागपूर) : मी २३ वर्षाची आहे. या वयात देशाची संस्कृती, समस्या या पहायला, ऐकायला मिळते, ही माझ्यासाठीच मोठी संधी आहे.

पिंकी सिंग (नागपूर) : स्त्रियांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी मी भारत जोडो यात्रेत चालत आहे.

अतिषा पैठणकर (नाशिक) : देशामध्ये महिलांची सुरक्षा आणि बेरोजगारीची समस्या आहे. यातून लोकांची सुटका व्हावी, म्हणून राहुल गांधींना साथ देत आहे.

Bharat Jodo Yatra Latest News
मोठी बातमी : Sanjay Raut शंभर दिवसानंतर कारागृहातून बाहेर येणार ; जामीन मंजूर

रोषणलाल निट्टू (चंद्रपूर) : देशामध्ये द्वेषभावना, जातीय आणि धार्मिक कट्टरता तसेच वाढती बेरोजगारी यामुळे समाज अस्वस्थ आहे. म्हणून मी चालतोय.

प्रेरणा गौर (चंद्रपूर) : राज्यातील १४० जणांमधून माझी निवड झाली. याचा आनंद आहे. बेरोजगारी, भ्रष्टाचार वाढला असून संविधानावरही घाला घातला आहे.

डॉ. मनोज उपाध्ये (नवी मुंबई) : राहुल गांधींची ही यात्रा भारताला जोडण्यासाठी आहे. या चांगल्या कार्यात माझाही सहभाग असावा म्हणून मी चालतोय.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com