भरत गोगावलेंचा शिवसैनिकांना इशारा : अंगावर आल्यास शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही...

भरत गोगावले यांना धमकीचे निनावी फोन कॉल येत आहेत.
Bharat Gogawle
Bharat GogawleSarkarnama

Shivsena Vs Shinde : मुंबई - शिवसेनेचे बंडखोर आमदारांविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. यातील बंडखोर आमदार उदय सामंत यांच्या वाहनावर हल्ला झाला तर भरत गोगावले ( Bharat Gogawle ) यांना धमकीचे निनावी फोन कॉल येत आहेत. शिवसैनिकांकडून होत असलेल्या हल्याबाबत पत्रकारांनी भरत गोगावले यांना विचारले असता त्यांनी 'अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही', असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Bharat Gogawle
Shivsena Vs Shinde : बंडखोर आमदार भरत गोगावलेंना जीवे मारण्याची धमकी

हल्ल्यांच्या संदर्भात आमदार गोगावले म्हणाले, आम्ही समजून घेण्याच्या तयारीत आहोत. मात्र ते समजून घेत नसतील तर आम्हाला त्यांच्याच पद्धतीने वागावे लागेल. जशास तसे उत्तर देणे आमचे काम आहे. अजूनही आम्ही संयम पाळला आहे. याचा अर्थ असा नाही की आम्ही घाबरतो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ते पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली यात पुढील सुनावणीची तारीख 8 ऑगस्ट दिली आहे. पुढे खंडपीठाची स्थापना करून त्याचा फायदा होईल. न्यायमूर्ती त्यांचे व आमचे म्हणणे ऐकत आहेत. न्यायालयाला निर्णय देण्यासाठी थोडावेळ लागतोच. दोन्ही बाजूचे युक्तीवादातून 8 ऑगस्टला निर्णय होईल. त्याला आम्ही सामोरे जावू, असे त्यांनी सांगितले.

Bharat Gogawle
video: भरतशेठ गोगावले यांची रोखठोक भूमिका

अंगावर आले तर शिंगावर घेणार

उदय सामंतांच्या वाहनावरील हल्ल्या संदर्भात त्यांनी सांगितले की, ज्याच्या पायाखालील वाळू सरकली त्यांना असे उद्योग सुचतात. ते एवढे दौरे काढत आहेत. एवढी गर्दी जमवत आहेत. त्या गर्दीचा फायदा घेऊन त्यांना पुढे जायला पाहिजे. असे आमचे मत आहे. असा हल्ला करणे योग्य नाही. दहशत, वाहनांवरील दगडफेक अशा गोष्टी आम्हाला नवीन नाहीत. मात्र आम्हाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे की, कोणी काही करायचे नाही. अंगावर आले तर शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही, हा आमचा बाणा आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Bharat Gogawle
'शिंदे-फडणवीसांना ८ ऑगस्टपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार करता येणार नाही!'

मंत्रिमंडळ विस्तार दोन दिवसांत होईल असे आम्हाला वाटू लागले आहे. कारण शुभमुहुर्त जवळ येऊ लागला आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रमाणाबाहेर धावपळ केली. मी त्यांना सांगितले की, जास्त धावपळ करू नका. शेवटी शरीर आहे. रात्री 3 वाजेपर्यंत जागणे. वेळेवर झोप, जेवण नाही. त्यामुळे त्यांना एक दिवस आराम करायला सांगण्यात आला आहे. त्यांची प्रकृती बिघडलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

आम्ही शिवसेनेच्या बाहेर गेलो नाही. मग आमचे रक्त शिवसैनिकाचे नाही का? न्यायालयीन व जनतेच्या दरबारात लढाई सुरू आहे. ज्याचे सत्य असेल ते समोर येईल. वेळ आली तर राजीनामे देऊन निवडणुकीलाही आम्ही सामोरे जाऊ. निवडणुकीला आम्ही घाबरत नाही. आम्ही लढवैय्ये आहोत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com