Mumbai Congress President : मुंबई अध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर भाई जगताप म्हणाले; 'पक्षाने माझ्याशी चर्चा..'

Bhai Jagtap Dismiss from Mumbai Congress President : चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसबद्दल...
Bhai Jagtap Dismiss from Mumbai Congress President :
Bhai Jagtap Dismiss from Mumbai Congress President :Sarkarnama

Mumbai News : मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांना अध्यक्षपदावरून हटवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी आता माजी शालेय शिक्षण मंत्री व काँग्रेसच्या नेत्या वर्षा गायकवाड यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने मुंबई काँग्रेसमध्ये अचानक केलेल्या या बदलामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. यावर आमदार आणि मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bhai Jagtap Dismiss from Mumbai Congress President :
Priyanka Gandhi and UP Politics: प्रियंका गांधी युपी'चे राजकारण सोडणार? 2024 च्या आधी होणार मोठे फेरबदल...

“याबाबत माझ्याशी पूर्वीच चर्चा करण्यात आली होती. मागील आठवडाभरापासून ही चर्चा असून, सर्व नेत्यांशी सल्लामसलत सुरू असून, नेत्यांशी बोलूनच याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. संजय निरूपम, मिलिंद देवरा इत्यादी मुंबई व राज्यातील नेत्यांशी चर्चा करूनच मुंबई काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आमचे नेते एकनाथ गायकवाड यांच्याशी बोलूनच अध्यक्षपदावर माझी नियुक्ती करण्यात आली होती. मुंबई काँग्रेस एका महिलेला संधी देते, याचा मला आदर आणि अभिमान आहे,” असं भाई जगताप म्हणाले.

"वर्षा गायकवाड यांच कार्य चागलं आहे. यापूर्वी मंत्री म्हणून आणि विशेषत: शिक्षण क्षेत्रात अतिशय चांगलं काम त्यांनी केलं आहे. माझी जेव्हा नियुक्ती करण्यात आली होती. तेव्हाही गायकवाड यांचं नाव चर्चेत होते. त्यामुळे हटवलं आणि ठेवणं हा प्रकार नसतो, असे भाई जगताप म्हणाले.

Bhai Jagtap Dismiss from Mumbai Congress President :
Priyanka Gandhi Will Contest Lok Sabha Elections : प्रियंका गांधी लोकसभा लढणार ? ; काँग्रेसची नवी खेळी, सोनिया गांधींनी सांगितलं..

जगताप यांचं पद का गेलं?

विधान परिषदेच्या निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसकडून कारणं शोधण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. याबाबत काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी काँग्रेस हायकमांडला सादर केलेल्या अहवालानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रकांत हंडोरे यांच्या पराभवामुळे काँग्रेसबद्दल अनुसूचित जातींच्या वर्गामध्ये नाराजी होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com