Bhagatsingh Koshyari : राज्यपालांनी राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो? स्वीकारण्याचा अधिकार कुणाला?

Bhagatsingh Koshyari : राज्यपालांनी राजीनामा पंतप्रधानांना दिला आहे.
Bhagatsingh Koshyari
Bhagatsingh KoshyariSarkarnama

Bhagatsingh Koshyari : आपल्या वक्तव्यांनी नेहमी वादात अडकणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आता राजीनाम्याच्या तयारीत आहेत. राज्यपालांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदावरून मुक्त करावं अशी इच्छी व्यक्त केली आहे. राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता एकच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान,राज्यापालांनी जर राजीनामा सुपूर्द केला तर तो कोणाकरवी घेतला जाईल? त्याची कायद्यात्मक प्रक्रिया काय आहे, याचा अनेकांना प्रश्न पडलेला आहे.

राज्यपालांची नेमणूक होते कशी?

राज्यपालाची नेमणूक देशाच्या राष्ट्रपतींकडून केली जाते. राष्ट्रपती पदासाठी पात्रताचे निकष विहित केलेले आहेत. ती व्यक्ती भारताचा नागरिक असावी. त्याने वयाची ३५ वर्षे पूर्ण केलेली असावीत. सामान्यपणे राज्यपालाचा कार्यकाल हा ५ वर्षांचा असतो. मात्र अपवादात्मक परिस्थितीत पाच वर्षांची मुदत संपल्यावरदेखील, त्याची व्यक्तिची नियुक्ती पुन्हा त्याच पदावर राष्ट्रपती करु शकतात. याशिवाय राज्यपालाला पदावरुनही हटवू शकतात. (Latest Marathi News)

Bhagatsingh Koshyari
Karad : लव्ह जिहादच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांचा भव्य मोर्चा...

राज्यपालांचा राजीनामा कोण मंजूर करतं?

राज्यपालांना कार्यकाल संपायच्या आधी राजीनामा द्यायचा असल्यास राष्ट्रपतीस संबोधून आपल्या अधिकारपदाचा सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकतात. १५५ कलमाच्या आधारेराज्यपालांची नियुक्ती ही राष्ट्रपतींकडून केली जाते. तर राष्ट्रपती हे ७४ व्या कलमाप्रमाणे पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार याप्रक्रिया पार पाडतात. यामुळे वास्तविक राज्यपालांची निवड आणि त्यांना पदावरुन हटवणं या दोन्हीबाबत पंतप्रधानांच्या हाती जातं. मात्र यांस राष्ट्रपतींची सहमती हवी.

Bhagatsingh Koshyari
Karad : काश्मीरमध्ये कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना मिठ्या मारणे हा बाळासाहेबांचा अपमानच... दीपक केसरकर

राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात काय म्हटलं?

भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपल्याला राज्यपाल पदावरून मुक्त करावे अशी पंतप्रधानांकडे इच्छा व्यक्त केली. मी राजीनामा देण्यासाठी इच्छुक आहे, असे कोश्यारी म्हणाले आहेत.आपण यापुढचा काळ अध्ययन, मनन, चिंतन यासाठी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे मुंबई दौऱ्यावर आले असता, यावेळी कोश्यारी यांनी मोदींकडे राजीनामा पत्र सुपूर्द केल्याचे सांगण्यात येत आहे.

"महाराष्ट्राच्या भूमीच्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा मान आपल्याला मिळणेभाग्य होते. मागील तीन वर्षांपेक्षा जास्त काळ राज्यातील जनतेकडून मिळालेले प्रेम कधीही विसरणार नाही, असं राज्यपालांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com