Bhagatsingh Koshyari : राज्यपाल कोश्यारींना महाराष्ट्रातून हाकलून लावा ; संभाजीराजे भडकले!

Bhagatsingh Koshyari : महाराष्ट्रात इतका घाणेरडा विचार घेऊन राज्यपाल येऊच कसे शकतात
Sambhajiraje Chhatrapati
Sambhajiraje Chhatrapati Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केले आहे. कोश्यारी यांनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करत, शिवाजी महाराज तो पुराने जमाने के आदर्श है, अभी तुम्हारे सामने नितीन गडकरी जैसे आदर्श है, असे वक्तव्य केले. आता या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे. यावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांवर आक्रमक टीका केली आहे.

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, राज्यपाल कोश्यारी महाराष्ट्रातून हाकलून लावा, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नकोय, अशी विनंती पंतप्रधान मोदींकडे करणार. ते पुढे म्हणाले, राज्यपाल असे का बडबडतात मला कळत नाही. यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या. मी हात जोडून पंतप्रधानांना बोलू इच्छीतो की कृपया, अशी व्यक्ती महाराष्ट्रात नकोय आम्हाला. महाराष्ट्राचं वैभव असलेल्या या संताच्या भूमीत इतका घाणेरडा विचार घेऊन येऊच कसे शकतात हे, असे संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केली.

नेमकं काय म्हणाले होते राज्यपाल कोश्यारी ?

'शिवाजी महाराज तो पुराने जमाने की बात है, अभी तुम्हारे सामने गडकरी जैसे आदर्श है. मला असं वाटतं, जर कोणी विचारलं तुमचे आदर्श कोण आहेत, तर बाहेर जाण्याची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला मिळतील. शिवाजी तर जुने झाले, मी नवीनांबद्दल बोलतोय. आंबेडकरांपासून ते गडकरीपर्यंत इथेच मिळतील, असे ते म्हणाले.

Sambhajiraje Chhatrapati
'शिंदे-फडणवीस हे सरकार पाडण्यात एक्सपर्ट!'

आता राज्यपाल यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विविध पक्ष आणि संघटनांकडूनही यावर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. या आधीही राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com