राज्यपालांनी पंतप्रधानांसमोरच CM ठाकरेंना डिवचलं; औरंगबाद पाणीप्रश्न केंद्राच्या कानावर

Governor Bhagat Singh Koshyari | Uddhav Thackeray | Ajit Pawar : गतवेळी अजित पवार यांनी पंतप्रधानांसमोर राज्यपाल कोश्यारी यांना डिवचले होते.
Governor Bhagat Singh Koshyari | Uddhav Thackeray | Ajit Pawar
Governor Bhagat Singh Koshyari | Uddhav Thackeray | Ajit PawarTwitter | Sarkarnama

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) आणि राज्य सरकार यांच्यामधील वाद महाराष्ट्राला नवा नाही. मात्र आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासमोर भाषण करताना राज्यपालांनी औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांना डिवचल्याने आता आणखी एका वादाची पायाभरणी झाली असल्याचे बोलले जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात आज सकाळी त्यांनी देहूमध्ये संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केले. त्यानंतर ते मुंबईमधील कार्यक्रमांना रवाना झाले. यावेळी त्यांनी राजभवनातील 'क्रांती गाथा' या भूमिगत दालनाचे उद्घाटन केले. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांच्या राज्यपाल पदाच्या कारकिर्दीमध्ये केलेल्या कामाचा पाढा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाचून दाखविला. यावेळीच बोलताना त्यांनी औरंगाबादचा पाणी प्रश्न पंतप्रधान मोदी यांच्या कानावर घातला. (PM Narendra Modi Latest News)

राज्यपाल कोश्यारी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये वैधानिक विकास महामडंळ आहेत. मात्र दोन वर्षांपासून त्यांची पुनर्स्थापनाच झालेली नाही. पण मी सातत्याने या महामंडळाच्या कामाचा आढाव घेत असतो. संविधानात उल्लेख आहे, त्यामुळे या गोष्टी माझ्यावर बंधनकारक आहेत. विशेषतः यातील सिंचनाच्या योजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. इथे जयंत पाटील आहेत, त्यांच्याशी माझी बैठक झाली, अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली. (PM Narendra Modi Latest News on maharashtra Visit)

महाराष्ट्रात ८० अशा योजना आहेत, ज्या २० ते ३० वर्षांपासून अस्तित्वात आहेत. काहींना तर ४० वर्षं झाली आहेत. काही योजनांमध्ये ९० टक्के, काहींमध्ये ७५ टक्के काम झाले. पण लोकांना अद्याप या योजनांचा लाभ मिळतं नाही. अश्या अनेक अर्धी कामं झालेल्या योजना आहेत. मी शेतकऱ्याचा आणि गरीब घरचा मुलगा आहे, त्यामुळे मला वाटतं की लोकांना पाणी मिळालं पाहिजे. मी औरंगाबादला गेलो होतो, तेव्हा तिथे लोकांनी येवून सांगितले, आम्हाला ७ ते ८ दिवसांनंतर पाणी मिळतं, अशी माहिती राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांना दिली.

काही वर्षांपूर्वी अरुण जेटली म्हणाले होते, मोदी है तो मुमकिन है. मी देखील आज ८ वर्षांनी म्हणतो, मोदी है तो मुमकिन है असं असेल तर मग या पाण्याच्या योजना देखील पूर्ण झाल्या पाहिजेत, असे आवाहन करतो. कारण माझ्यासारख्या एका सामान्य व्यक्तीवर एवढ्या मोठ्या आणि सुंदर राज्याची राज्यसेवक म्हणून जबाबदारी आहे. त्यामुळे या योजना पूर्ण झाल्या, लोकांना पाणी मिळाले तर माझी जबाबदारी पूर्ण होईल, इथे आल्याचे सार्थक होईल असेही राज्यपाल म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com