Bhagat Sing Koshyari : राज्यपालांना उपरती? आधी छत्रपतींबद्दल वादग्रस्त विधान, आता गौरवोद्गार!

Bhagat Sing Koshyari : एकीकडे राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्याच्या मागणीने जोर धरला असतानाच कोश्यारींनी आता वादग्रस्त विधानावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Bhgat singh Koshyari latest news
Bhgat singh Koshyari latest newsSarkarnama

Bhagat Sing Koshyari News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी( bhagat singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला होता. राज्यपालांविरोधातील असंतोषाची धग अद्यापही कमी झालेली नाही. मात्र, आता वादग्रस्त विधानांनंतर अडचणीत आलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांबद्दल गौरवोद्गार काढत निर्माण झालेल्या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. (Bhgat singh Koshyari latest news)

Bhgat singh Koshyari latest news
Ajit Pawar : "अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है," ; अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

मुंबईतील कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी बोलत होते. कोश्यारी म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या महान लोकांनी देशाला समृद्ध केले आहे. त्यांच्यासारख्या लोकांमुळेच देशाची संस्कृती जगभरात अजरामर असल्याचंही कोश्यारी यांनी म्हटलं आहे.

Bhgat singh Koshyari latest news
Satara : पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, राज्यपालांना माझा कोपरापासून नमस्कार...

राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एका कार्यक्रमात आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे, तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हांला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत. या वक्तव्यानंतर कोश्यारींनी मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत असून त्यांची राज्यपाल पदावरून उचलबांगडी करण्याच्या मागणीनेही जोर धरला आहे.

त्यानंतर आजच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्या नावाचा गौरव करुन त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचं दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com