Bhagat Singh Koshyari : धोतर, काळी टोपी जाळली ; कोश्यारींच्या विरोधात शिवप्रेमी रस्त्यावर

Bhagat Singh Koshyari : राज्यपालांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले. तर 'कोश्यारी हायहाय' अशा घोषणाबाजी देखील करण्यात आली.
bhagat singh koshyari controversial statement
bhagat singh koshyari controversial statementsarkarnama

Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. शनिवारी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपाल कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. राज्यपालांच्याविरूद्ध आंदोलनकर्ते आक्रमक होताना दिसत आहेत. (bhagat singh koshyari controversial statement over shivaji maharaj)

यावरुन आता मराठा क्रांती मोर्चा रस्त्यावर उतरला आहे. मुंबई विमानतळ येथे मराठा क्रांती मोर्च्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. यावेळी त्यांनी राज्यपालांच्या विरोधात घोषणा देत त्यांचा निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेस, शिवप्रेमी संघटना आता रस्त्यावर उतरल्या आहेत. यावरुनच आता संभाजीराजे छत्रपती यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्राबाहेर काढा असं म्हटलं आहे.

औरंगाबाद, नाशिक, पुणे, मुंबई येथे राज्यपालांच्या विरोधात आंदोलक संतप्त झाले आहेत. राज्यपालांना परत पाठवा, अशी मागणी विविध संघटनांनी केली आहे. आंदोलकांनी राज्यपाल कोश्यारी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला, तर काही ठिकाणी धोतर, व काळी टोपी जाळून त्यांना निषेध केला. यावेळी राज्यपालांच्या फोटोला जोडे देखील मारण्यात आले. तर 'कोश्यारी हायहाय' अशा घोषणाबाजी देखील करण्यात आली.

bhagat singh koshyari controversial statement
Jitendra Awhad : शिवरायांवरील वक्तव्यावरुन आव्हाड भाजप प्रवक्त्यांवर संतप्त ; म्हणाले..

औरंगाबादच्या क्रांती चौकात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मराठा संघटनांकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात येत आहे. राज्यपाल यांनी तत्काळ माफी मागावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. नेहमी वादग्रस्त विधान करणाऱ्या राज्यपालांना केंद्राने परत बोलवून घेण्याची मागणी देखील यावेळी करण्यात येत आहे. तर यावेळी काळी टोपी आणि काळी रुमाल घालून आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले आहे.

राज्यपालांना दुसरीकडे पाठवा-नांदगावकर

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी टि्वट करुन राज्यपालांचा समाचार घेतला आहे, ते आपल्या टि्वटमध्ये म्हणतात, "साठी बुद्धी नाठी ही म्हण अशा लोकांमुळेच पडली असेल. जिभेला जरी हाड नसेल तरी डोक्यात मेंदू असतो. एवढ्या मोठ्या राज्यपाल पदावर असलेल्यानी बोलताना तारतम्य बाळगणे गरजेचे आहे. या आधीही यांनी वारंवार भावना दुखविण्याचे काम केले आहे. यांच्या वरिष्ठांनी यांना आता दुसरीकडे पाठवायला हवे,"

राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हटलं ?

शनिवारी औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभ सुरु होता. त्यावेळी भगतसिंह कोश्यारींच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपचे नेते नितीन गडकरी डीलिट ही पदवी देऊन गौरवण्यात आलं. या कार्यक्रमात कोश्यारी म्हणाले, "आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आमचे शिक्षक आम्हाला विचारत असत की तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले झाले. मी आत्ताच्या काळात बोलत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in