Shiv Sena : शिंदेंचा ठाकरेंना आणखी एक दणका ; राज्यपालांकडून ठाकरेंच्या यादीला केराची टोपली

Shiv Sena : राज्याला पुन्हा एकदा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राज्यात सत्तातर झाल्यानंतर आघाडी सरकारला शह देण्यासाठी राज्यपाल नियुक्त बारा आमदारांची यादी (mlas appointed by the governor) रद्द केली जाईल, याबाबतची चर्चा अखेर खरी ठरली.

ठाकरे सरकारने राज्यपालांना (bhagat singh koshyari) पाठवलेली यादी रद्द समजावी, असे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पाठवले होते, ही यादी रद्द करण्यात आल्याचे पत्र राजभवनाकडून मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

Eknath Shinde Latest Marathi News, Shiv Sena Latest Marathi News
Shiv Sena : पळपुट्यांना हिंदुत्ववीरांच्या पदव्या बहाल करणे महाराष्ट्राचा अपमान, रामदेव बाबा, मुख्यमंत्र्यांना टोला

राज्याला पुन्हा एकदा नवा वाद पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाकरे सरकारची यादी रद्द करुन शिंदे सरकारची यादी कुठल्या आधारे स्वीकारली, याबाबत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काल (शनिवार) शिवसेनेचे नेते अंबादार दानवे यांनी जुनी यादी रद् करुन नवी यादी स्वीकारल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

८ जागा भाजपला, तर ४ जागा शिंदे गटाला

आता नवीन यादी शिंदे सरकारने राज्यपालांना पाठवली आहे. यात कुणीची वर्णी लागते याची चर्चा रंगली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सभासदांची संख्याबळ पाहता १२ नियुक्त आमदारांपैकी ८ जागा भाजपला, तर ४ जागांवर शिंदे गटातील सदस्यांची वर्णी लागू शकते, असे राजकीय विश्लेषणांचे मत आहे. जर भाजपला आठ जागा मिळाल्या तर विधान परिषदेत भाजपचेही बळ वाढणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in