Shivsena : गद्दारी, विश्वासघात ही केसरकरांसह ४० आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी...प्रियांका चतुर्वेदी

प्रियांका चतुर्वेदी Priyanka Chaturvedi म्हणाल्या, बाळासाहेबांचे Balasaheb Thackeray विचार स्पष्ट होते, कोणासोबत गद्दारी करायची नाही. मात्र, ४० आमदारांनी 40 MLAs पाठीत खंजीर खूपसला.
Deepak Kesarkar, Priyanka Chaturvedi
Deepak Kesarkar, Priyanka Chaturvedisarkarnama

मुंबई : गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली आहे. आणखी दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. या दहा दिवसांमध्ये जी मनमानी करायची ती करा. 22 तारखेला न्यायालयाचा निकाल येईल, त्यानंतर शिंदे गटासाठी काळ्या रात्री असतील, असा टोला शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी लगावाला आहे.

शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या, बाळासाहेबांचे विचार स्पष्ट होते, कोणासोबत गद्दारी करायची नाही. मात्र, ४० आमदारांनी पाठीत खंजीर खूपसला. गद्दारी आणि विश्वासघात ही केसरकर आणि 40 आमदारांची प्रायव्हेट प्रॉपर्टी बनली आहे, अशी टीका त्यांनी केली.

Deepak Kesarkar, Priyanka Chaturvedi
Fadanvis : खरी शिवसेना आमच्यासोबत, पवारांचे दुःख वेगळे ; फडणवीसांचा टोला

त्या म्हणाले, आणखी दहा दिवस शिंदे गटासाठी चांदणी रात्र आहे. या दहा दिवसांत जी काही मनमानी करायची ती करा. मात्र, 22 तारखेला न्यायालयाचा निकाल येईल. त्यानंतर पुढील सर्व रात्री या शिंदे गटासाठी काळ्या रात्री असतील. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, असा आम्हाला विश्वास असल्याचे प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.

Deepak Kesarkar, Priyanka Chaturvedi
Sanjay Rathod : चित्रा वाघ म्हणतात; संजय राठोडांच्या ‘क्लिन चिट’चा खुलासा उद्धव ठाकरेंनी करावा

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, चित्रा वाघ या सर्वज्ञानी आहेत. मात्र, सध्या पक्षात त्यांची अवस्था 'न घर का ना घाट का' अशी झाली आहे. संजय राठोडांविरोधात त्यांनी एवढा संघर्ष केला. मात्र त्यांचे पक्षात कोणही ऐकलं नाही, असेही त्या म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com