Congress MLA Amin Patel Latest News
Congress MLA Amin Patel Latest News Sarkarnama

मुंबईत सर्वोत्तम कामगिरी करणारा आमदार काँग्रेसचा; अमिन पटेलांनी मिळवले ८२ टक्के

Congress|Amin Patel|BJP : भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांना फक्त ३१ टक्के मिळाले आहेत.

मुंबई : मुंबईतील आमदारांच्या कामागिरीचा आढावा घेणारा अहवाल `प्रजा फाऊंडेशन`कडून आज प्रसिद्ध केला. यामध्ये कॅाग्रेसचे (Congress) आमदार अमिन पटेल (Amin Patel) यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवत मुंबईत (Mumbai) सर्वोत्तम कामगिरी करणारे आमदार म्हणून प्रथम क्रमांक पटकावला आहे.

हिवाळी अधिवेशन २०१९ ते पावसाळी अधिवेशन २०२१ या कालावधीत आमदारांचे मूल्यांकन करून ही क्रमवारी ठरवण्यात आली. यामध्ये फक्त एकाच आमदाराला ८० टक्क्यांहून अधिक गुण मिळवता आले आहेत. यामध्ये मुंबईतील आमदारांच्या `टॉप १०` क्रमवारीत काँग्रेसचे आमदार पटेलांनी अव्वल स्थान पटकावले. तर `बॉटम फाईव्ह` मध्ये शिवसेनेचे (Shivsena) आमदार रवींद्र वायकर यांनी पहिल्या क्रमांकावर बाजी मारली. पक्षनिहाय कामगिरीतही कॉंग्रेसने अव्वल स्थान मिळवल्याचे या अहवालातून समोर आले आहे. (Congress MLA Amin Patel Latest News)

Congress MLA Amin Patel Latest News
शिवसेनेनंतर ठाकरे घराण्यात फूट : स्मिता ठाकरे शिंदे गटात प्रवेश करणार

मुंबईत सर्वोत्तम कामगिरी केलेले `टॉप फाईव्ह` आमदार तर क्रमवारीत शेवटच्या पाच स्थानावर असलेल्या आमदारांची यादी प्रजा फाऊंडेशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आली. या मध्ये आमदारांनी विधानसभेत विचारलेले सर्वसामान्यांचे प्रश्न, सभागृहातील हजेरी आणि गुन्ह्यांची नोंद आदी निकष ठेवण्यात आले. क्रमवारी ठरवताना विधानसभेत अधिवेशन काळात विचारलेले प्रश्न, प्रश्नांची गुणवत्ता, आमदार निधीचा वापर यासारख्या निकषांसाठी ८७ पैकी गुण देण्यात आले. शैक्षणिक अहर्ता, पॅन कार्ड आणि गुन्हेगारीची प्रकरणे या निकषासाठी १३ पैकी गुण देण्यात आले. २०१९ च्या निवडणुकीनंतरच्या नव्या एफआयआरसाठी ५ गुण वजा करण्यात आले. तर प्रलंबित चार्ज शीटसाठीही पाच गुण वजा करण्यात आले. आमदारांना एकूण १०० पैकी गुण देण्यात आले आहेत.

टॉप फाईव्ह आमदार

आमदार पक्ष मिळालेले गुण (१०० पैकी)

अमिन पटेल काँग्रेस ८१.४३

पराग अळवणी भाजप ७९.९६

सुनील प्रभू शिवसेना ७७.१९

अमित साटम भाजप ७५.५७

अतुल भातखळकर भाजप ७३.६१

बॉटम फाईव्ह आमदार

आमदार पक्ष मिळालेले गुण (१०० पैकी)

रवींद्र वायकर शिवसेना २८.५२

प्रकाश सुर्वे शिवसेना २९.७६

राहुल नार्वेकर भाजप ३१

मंगल प्रभात लोढा भाजप ३१.४९

झिशान सिद्दिकी काँग्रेस ३२.५४

अधिवेशनाचा कालावधी वाढवा`

दरवर्षी आमदारांच्या प्रश्नांच्या संख्येचा तसेच अधिवेशनातील कालावधीतील दिवसांचा ट्रेंड हा कमी होतानाच आढळला आहे. कोरोनानंतर अधिवेशनाचा कालावधी वाढतानाच नागरिकांच्या जिव्हाळ्याचे आरोग्य, गृहनिर्माण, शिक्षण यासारख्या विषयांवरही लक्ष केंद्रित करून धोरणे आखायला हवीत, असे मत प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी व्यक्त केले.

Congress MLA Amin Patel Latest News
सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरेंना मोठा दिलासा; शिवसेनेची 'ती' याचिका घेतली दाखल करून

महाराष्ट्र मोठे राज्य असूनही देशपातळीवर अधिवेशनाचे कामकाज करण्याच्या कामगिरीत महाराष्ट्र १० व्या क्रमांकावर आहे. कोरोनामुळे डेटा गोळा करण्यात अनेक अडचणी होत्या. तरीही २०२१ च्या पावसाळी अधिवेशनापर्यंतचा डेटा आम्ही जमवला आहे. आमदारांचे `रिपोर्ट कार्ड` हे विधानसभा क्षेत्रातील कामाचे आणि नागरिकांचे प्रतिनिधीत्व करणारे आहे, असे प्रजा फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हस्के यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in