सावधान! राजधानी मुंबईत कोरोनाचा विस्फोट

राज्यातील सर्वाधिक सक्रीय रुग्ण सध्या मुंबईममध्ये आहेत. मुंबईत एकूण 2526 सक्रीय रुग्ण आहेत.
सावधान! राजधानी मुंबईत कोरोनाचा विस्फोट

Covid 19 news in Mumbai

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून मुंबईत आटोक्यात आलेली कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या दीड ते दोन महिन्यांत शंभरच्या खाली दैनंदिन स्थरावलेली रुग्णसंख्या गेल्या आठवड्यापासून तीनशेच्यावर आढळू लागली आहे.

मंगळवारी राज्यात 711 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. गेल्या चोवीस तासांत एकूण 366 रुग्ण बरे झाले. विशेष म्हणजे देशातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्यचे दिसून येत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 हजार 338 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे.

सावधान! राजधानी मुंबईत कोरोनाचा विस्फोट
काँग्रेससोबत काम न करण्याचे प्रशांत किशोर यांनी सांगितले कारण..

दरम्यान, राज्यातील कोविड-19 प्रकरणे वाढत राहिले तर सरकारला निर्बंधांबाबत पुन्हा विचार करावा लागेल, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला आहे. कोरोनाव्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढली तर महाराष्ट्र सरकारला पुन्हा काही मार्गदर्शक तत्त्वे लागू करावी लागतील, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

राज्यातील सर्वाधिक सक्रीय रुग्ण सध्या मुंबईममध्ये आहेत. मुंबईत एकूण 2526 सक्रीय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 10,43,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तर कोरोना वाढीचा दरही 0.029% टक्के इतका आहे.

पुण्यात सक्रीय रुग्णसंख्या 297 इतकी आहेत. पालघर 29, रत्नागिरी 15, ठाण्यात 413, रायगड 83 अहमदनगर 17, आणि नागपूरमध्ये 21 सक्रीय रुग्ण आहेत. तर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यभरात एकूण 3475 सक्रिय रुग्ण आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळाशी सविस्तर चर्चा करुन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये किंवा नवीन निर्बंधांमध्ये कोणता बदल करण्याचा विचार केला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. तर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीदेखील बीजिंग आणि शांघायसारख्या शहरांमध्ये नवीन निर्बंध लागू करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात नवीन प्रकरणांमध्ये वाढ झाली तर नागरिकांना पुन्हा घरीच राहण्याचा इशारा दिला जाईल असेही मंत्री टोपे यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in