बावनकुळे, मुनगंटीवार म्हणतात, राज्यपाल कोणत्या संदर्भाने बोलले माहिती नाही..

BhagatSingh Koshyari : राज्यपालांच्या वादग्रस्त विधानावर भाजप नेत्याची बचावात्मक भूमिका.
Rajyapala Bhagatsingh Koshyari
Rajyapala Bhagatsingh KoshyariSarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यभर यावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र याबाबत आता भाजपनेत्यांकडून सावध भूमिका घेतली जात आहे. भाजपकडून आता बचावात्मक पवित्रा घेतला जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यपालांनी हे विधान कोणत्या संदर्भाने केले हे आपल्याला माहित नाही, तर मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही राज्यपालांना तसे म्हणायचे नसेल, असे म्हणत सारवासारव केली.

Rajyapala Bhagatsingh Koshyari
राज्यपालांच्या विधानावर शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘राजघराण्यातील सदस्य म्हणून मी...’

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रीया देताना मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य करताना राज्यपालांनी यांनी कालबाह्य शब्दाचा वापर केला नाही. 'जाणता राजा' म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही लोक संबोधतात. याचा अर्थ पवारांची छत्रपती शिवाजी महाराज सोबत तुलना होत आहे, असे नाही.

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनादेखील काही जण प्रतिशिवाजी म्हणून संबोधतात. याचा अर्थ बाळासाहेब हे शिवाजी महाराज होतात का? उदाहरणे सांगताना ते प्रतिकात्मक म्हणून वापरला जातो. दोन बंधूमध्ये प्रेम असेल तर आपण त्यांना राम आणि लक्ष्मण उपमा देतोच. यामध्ये कोणाचाही अवामान किंवा अनादर करण्याचा हेतू असत नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

Rajyapala Bhagatsingh Koshyari
Mohan Bhagawat : 'नरेंद्र मोदी आमचे स्वयंसेवक, मात्र त्यांच्यावर संघाचा दबाव नाही!'

यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, राज्यपालांच्या या विधानाचा संदर्भ मला माहित नाही. मात्र, शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. महाराजांची तुलना कोणाशीच होऊच शकणार नाही. मात्र सावरकर यांच्याविषयी बोलताना राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं आहे, उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी आधी महाविकास आघाडीतून बाहेरपडून सावरकरांवरील प्रेम दाखवावं. ठाकरे हे काँग्रेसधारर्जीणे आहेत, असे बावनकुळे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com