Maharashtra Politics : शिंदे-फडणवीसांमध्ये श्रेयवादावरुन लढाई ; मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर फडणवीसाचं टि्वट.. म्हणाले...'

Battle of Credit Between Shinde-Fadnavis : ही मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती.
Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Devendra Fadnavis, Eknath Shinde: Sarkarnama

Coastal Road Chhatrapati Sambhaji Maharaj Name News : देशभरात काल (रविवारी) संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुंबईतील कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराज कोस्टल रोड नाव देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वट करीत ही मागणी मी 16 मार्च 2023 ला मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं म्हटलं. त्यामुळे कोस्टल रोडच्या नामकरणावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली आहे का असा असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते..

संभाजी महाराज यांची आज 366 वी जयंती होत असतानाच आजच्या ठिकाणी अविस्मरणीय सोहळा पार पडत आहे.शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचा पाया रचला आणि संभाजी महाराज यांनी त्याला कळस चढवला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांनी अनेक पराक्रम गाजवले. त्यामुळे त्यांच्या शौर्याच्या आठवणी आपण जतन करणे गरजेचे आहे. आघाडी सरकार अल्प मतात आल्यावर घाईघाईने हा निर्णय घेतला होता, पण त्यानंतर अधिकृतपणे आपण त्याला परवानगी दिली आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Karnataka Election Result 2023 : नावात काय आहे ? ; नामसाधर्म्यामुळं काँग्रेसचा केवळ सोळा मतांनी पराभव..; भाजपची खेळी ?

फडणवीस म्हणतात...

मुंबईतील कोस्टल रोडला आपल्या सर्वांचे आदर्श धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. 16 मार्च 2023 रोजी यासंदर्भातील मागणी एका पत्रातून मी त्यांच्याकडे केली होती आणि आज छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्यासंदर्भातील घोषणा त्यांनी केली, मी त्यांचे मनापासून आभार मानतो. या परिसरात छत्रपती संभाजी महाराज यांचा दिमाखदार पुतळा सुद्धा उभारण्यात येणार आहे, असेही त्यांनी जाहीर केले आहे. ही छत्रपती संभाजी महाराजांना संपूर्ण महाराष्ट्राच्यावतीने जयंतीदिनी अनोखी आदरांजली आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत म्हटंल आहे.

Devendra Fadnavis, Eknath Shinde:
Mallikarjun Kharge Summoned : 'बजरंगबली'मुळे मल्लिकार्जुन खर्गे संकटात ; प्रचारातील विधान अंगलट आलं..

राजपूत समाजासाठी ‘भामटा’ हा शब्द यापुढे वापरला जाणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी केली. तर महाराणा प्रताप यांच्या समर्पणाची आठवण ठेवून यापुढे मुघल काळ न म्हणता महाराणा काळ म्हणायला हवे, असे मत संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी व्यक्त केले.

छत्रपती संभाजीनगरातील अयोध्यानगरी मैदानावर वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, रावसाहेब दानवे आदींची उपस्थिती होती.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com