संजय राऊतांना अटक झाली म्हणून बाळासाहेबांच्या ड्रायव्हरने दिल्लीत वाटले पेढे

Sanjay Raut|Shivsena : आता राऊत २०२४ पर्यंत तुरुंगातून बाहेर निघायला नको
Prakash Rajput & Sanjay Raut Latest News
Prakash Rajput & Sanjay Raut Latest News Sarkarnama

Sanjay Raut : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिनसेनेच्या ४० आमदारांसह बंड केल्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि भाजपच्या साथीने राज्यात नवं सरकार स्थापन झालं. मात्र बंडखोर आमदार आणि शिवसेमध्ये (Shivsena) दिवसेंदिवस जास्तच फूट पडतांना दिसत आहे. यामध्ये शिंदेंना मोठ समर्थन मिळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) पत्राचाळ गैरव्यव्हार प्रकरणी अटक करण्यात आली असून न्यायालयाकडून त्यांना ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र राऊतांना अटक झाली म्हणून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे वाहन चालक असलेले प्रकाश राजपूत यांनी आज (ता. २ ऑगस्ट) खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांची दिल्ली येथे भेट घेतली आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केला आहे. (Prakash Rajput & Sanjay Raut Latest News)

Prakash Rajput & Sanjay Raut Latest News
एकनाथ शिंदेंच्या रूपाने देवच भेटलाय : ठाकरेंना `व्हिलन` ठरवत शिवतारेंची स्तुतीसुमने

प्रकाश राजपूत असं या वाहन चालकांचं नाव असून त्यांनी १९९३ ते २००० या काळात बाळासाहेबांच्या गाडीवर चालक म्हणून काम केल्याचं त्यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलं आहे. ते धुळ्यातील शिरपूरचे असून राजपूत यांनी आज दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतली आणि राऊतांना अटक झाली म्हणून पेढे वाटून आनंद साजरा केला. संजय राऊत यांनी खुप चुकीच काम केलं असून त्यांनी शिवसेना संपवली. आता राऊत २०२४ पर्यंत तुरुंगातून बाहेर निघायला नको, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे.

Prakash Rajput & Sanjay Raut Latest News
मंत्रीमंडळ विस्तार होईपर्यंत मला शिक्षणमंत्री करा : राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना पत्र..

दरम्यान, शिंदे गटाकडून अगदी सुरवातीपासूनच संजय राऊत यांना लक्ष केलं जात आहे. तसेच आमचीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याच सांगण्यात येत आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंकडून आणि संजय राऊतांकडू बंडखोरांना जोरदार हल्लाबोल केला जात असून बंडखोरांना गद्दार असे संबोधले जात आहे. तसेच राऊत हे सातत्यांने शिवसेनेची बाजू मांडत बंडखोर आणि भाजपवर प्रहार करत होते. आता मात्र त्यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

शिंदे हे जुन्या शिवसैनिकांच्या भेटी-गाठी घेत असून आपण शिवसेना वाचवत असल्याचे म्हणत आहेत. यामध्ये ठाकरे घराण्यातील सदस्यांचाही शिंदेंना पठिंबा मिळाला असून बाळासाहेबांचे नातू निहार ठाकरे आणि सुन स्मिता ठाकरेंनीही त्यांना पाठिंबा दिला आहे. आता अशातच बाळासाहेबांचे गाडी चालक राजपूत यांनीही राऊतांवर टीका केल्याने त्यांच्या या प्रतिक्रियेची जोरदार चर्चा होत आहे. यामुळे शिंदे हे ठाकरे कुटुंबाची कोंडी करण्याची कुठलीही संधी सोडत नसल्याचे दिसत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in