बाळासाहेबांचा लाडका चंपासिंह थापाही शिंदेंच्या गळाला...

Balasaheb Thackeray : बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी ते शेवटचे शब्द थापा यांच्याशी बोलले होते.
Balasaheb Thackeray, Champasingh Thapa
Balasaheb Thackeray, Champasingh ThapaSarkarnama

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेला दिवसेंदिवस आमदार, खासदार, पदाधिकारी यांच्या रूपाने रोजच धक्के बसत आहेत.आता तर 'मातोश्री'वर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सेवेकरी म्हणून काम केलेले चंपासिंह थापा यांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे मोठी चर्चा होत आहे.

Balasaheb Thackeray, Champasingh Thapa
नऊशे शेतकरी MIDC ला देणार ३७२ एकर क्षेत्र; आमदार बोर्डीकरांच्या मध्यस्थीने होणार बैठक

थापा हे काही राजकीय व्यक्ती नाही. मात्र त्यांनी बाळासाहेबांची अनेक वर्ष सेवा केली आहे. यामुळे बाळासाहेबांचा थापांवर विशेष जिव होता. बाळासाहेबांचे निधन होण्यापूर्वी त्यांचे शेवटचे शब्द थापा यांच्याशी बोलले होते. थापा म्हणजे बाळासाहेबांच्या गळ्यातील ताईतच होता. थापा हे भांडूपमधील तत्कालीन नगरसेवक दिवंगत के टी थापा यांच्यामुळे बाळासाहेबांचे सेवक म्हणून रुजू झाले होते. तेव्हापासून ते त्यांची सेवा करायचे. यामुळे ते बाळासाहेबांच्या सोबतच असायचे यामुळे बाळासाहेब आणि थापा यांच्यात एक जिव्हाळ्याच नात निर्माण झालं होत.

दरम्यान, आजघडीला शिवसेनेत उभी फूट पडली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत थापा यांनी शिंदे गटात आज प्रवेश केला आहे. आता थापा काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. याआधी बाळासाहेबांच्या कारच्या चालकांनीही शिंदेंच्या घरी भेट देत त्यांच्या भूमीकेला पाठिंबा दिला होता आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर शिंदेंनी आता थेट थांपांना आपल्या बाजूने वळवले आहे. यावरूनही आता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका होऊ शकते, असे बोलले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com